29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeराजकीयसोनिया गांधींनी शरद पवारांशी पुन्हा साधला संवाद

सोनिया गांधींनी शरद पवारांशी पुन्हा साधला संवाद

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात आज सकाळी पुन्हा फोनवरून चर्चा झाली आहे. त्यानुसार सत्ता स्थापनेच्या दृष्टीने वेगवाना हालचालींना सुरूवात झाली आहे. सोनिया गांधीच्या सुचनेनुसार काँग्रेसचे दिल्लीतील नेते तातडीने मुंबईला रवाना होत आहेत. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

अशा महत्वाच्या बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी टिचकी मारा

सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्याशी सकाळी संवाद साधला आहे, आणि पुढील चर्चेसाठी अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे व मला पवार यांच्यासोबत पुढील चर्चेसाठी मुंबईला जाण्यास सांगितले आहे. आम्ही लवकरच पवार यांना भेटत आहोत, असे वेणूगोपाल यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे हे तिन्ही नेते आज तीन वाजेपर्यंत मुंबईत पोचतील अशी शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही पक्षांनी मिळून कशा पद्धतीने एकत्रित सरकार स्थापन करायचे याबाबत चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आज सुद्धा सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होणे कठीण : अजित पवार

अजित पवारांचा पलटवार, काँग्रेसमुळेच शिवसेनेला पत्र द्यायला उशीर झाला

‘शरद पवारांमुळे काल काँग्रेसने शिवसेनेला पत्र दिले नाही’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी