26 C
Mumbai
Tuesday, January 30, 2024
Homeमहाराष्ट्रकुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यात मुळशी पॅटर्न

कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यात मुळशी पॅटर्न

पुणे हे शहर (Pune City) विद्येचं माहेर घर आहे असं म्हणतात. पण काही वर्षांपासून पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी पाहायला मिळत आहे. अशातच आता पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार झाला आहे. हा गोळीबार पुण्यातील हडपसर येथे झाला असून शरद मोहोळ (Sharad Mohol) हे कोथरूड येथील सुतारदरा येथे जात असताना ही घटना घडली आहे. दुचाकीवरून येणाऱ्या अज्ञातांनी शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. यावेळी त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याच्यावर उपचार सुरू होते पण त्याचा मृत्यू (Sharad mohol Death) झाला. यामुळे आता हडपसर येथील पोलीस खुणाचा तपास करत आहेत. नेमका खून करण्याचा उद्देश काय होता? हा खून सूड उगवण्यासाठी केला होता का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. (Sharad mohol Firing)

दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे पुणे शहर हादरून गेलं आहे. शरद मोहोळवर गोळीबार करत काही अज्ञात पसार झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी शोधपथक काम करत आहेत. पूर्ववैमन्यस्यातून हा खून झाला असल्याची प्रथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे आता हडपसर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी घटनास्थळी ताबडतोब पोलीस गेले.

हे ही वाचा

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी सुरू

‘पोलिसवाले इतकं मारा की गाxxxची हड्डी तुटली पायजे, कुत्र्यासारखं मारा’

‘आव्हाड समोर आले तर वध करणार’

शरद मोहोळवर अनेक गुन्हे 

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. शरद मोहोळवर अनेक मोठे गुन्हे आहेत. त्याला अनेकदा पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे एक न् अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत. पिंटू मारणे याला मारण्याप्रकरणी शरद मोहोळलाच अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा जामीनावर त्याची सुटका करण्यात आली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी