33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय'शरद मोहोळला त्याच्या जवळच्या साथीदारानं मारलं', देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

‘शरद मोहोळला त्याच्या जवळच्या साथीदारानं मारलं’, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

पुणे शहरामध्ये दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) हत्या करण्यात आली. त्याला अज्ञातांनी बंदुकीने गोळ्या घालून मारले. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्याला लागल्याने त्याला स्थानिक रूग्णालामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तोवर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. कोथरूड येथील सुतारदरा येथे जात असताना ही घटना घडली आहे. यामुळे पुणे शहर हादरलं असून पुन्हा एकदा मोहोळ आणि मारणे गॅंग यांच्यामध्ये गेली अनेक वर्षांपासूनचा वाद पुन्हा उदयाला येऊ शकतो. यामुळे आता या दोन टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा वाद होणार असल्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. शरद मोहोळच्या झालेल्या खूनावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी वक्तव्य केलं आहे.

अनेक वर्षांपासून मारणे आणि मोहोळ या दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. या दोन्ही टोळींकडून रक्ताची होळी पाहायला मिळाली होती. आता तर हा खून म्हणजे सूड तर नाही ना? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. या खूनाचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही दिवसांआधी शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी हडपसरचे भाजप आमदार चंद्रकांत पाटील तसेच इतर स्थानिक पदाधिकरी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांनी टीका केली होती.

हे ही वाचा

‘मी फक्त ढकललं मारलं नाही’

कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यात मुळशी पॅटर्न

“दादा मला वाचवा” म्हणत सुरेश वाडकर यांनी अजित पवारांना केले ‘हे’ आवाहन

हडपसर येथे मोहोळ टोळीचे वर्चस्व अधिक आहे. मात्र भाजपने एका गुंडाला पक्षामध्ये घेतल्याने अनेक टीका होऊ लागल्या होत्या. याचवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद मोहोळच्या झालेल्या खूनावर वक्तव्य केलं आहे. शरद मोहोळच्या साथीदाराने हत्या केली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शरद मोहोळच्या झालेल्या खूनावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं, ‘कोणताही गॅंगवॉर नाही. कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदाराने केलेली आहे. गुंड कोणताही असो त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम सरकारच्या हाती असतं. त्यामुळे गॅंगवॉर करण्याची हिंमत कोणत्याही गुंडामध्ये नाही’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी