27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजन"दादा मला वाचवा" म्हणत सुरेश वाडकर यांनी अजित पवारांना केले 'हे' आवाहन

“दादा मला वाचवा” म्हणत सुरेश वाडकर यांनी अजित पवारांना केले ‘हे’ आवाहन

मागील अनेक दशकांपासून आपल्या सुमधुर आवाजाने हिंदी, मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून त्यांचे मनोरंजन करणारे गायक म्हणजे सुरेश वाडकर. मराठी, हिंदीसोबतच त्यांनी अनेक नानाविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सुरेश वाडकर नेहमीच प्रत्येक संगीतकाराची पहिली पसंती राहिले. आजही ते अनेकदा गाणी गाताना दिसतात. सोबतच ते सध्या विविध शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहतात. सोबतच त्यांनी आपल्याकडे असलेले गाण्याचे ज्ञान पुढच्या पिढीला देत गाण्यांचा वारसा सुरु ठेवला आहे. आज आपण पाहिले तर अनेक उत्तम गायकांना सुरेशजींनी तयार केले आहेत. मात्र सध्या सुरेश वाडकर एका वेगळ्याच कारणामुळे मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे.

नाशिकमध्ये नुकताच सुविचार मंचातर्फे आयोजित सुविचार गौरव पुरस्कार सोहळा महाकवी कालिदास कलामंदिरात संपन्न झाला. यावेळी गायक सुरेश वाडकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. तेव्हा सुरेशजींनी त्यांची नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयासाठी जागा खरेदी व्यवहारात कशा पद्धतीने फसवणूक करण्यात आली ते सांगितले.

हे ही वाचा

‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो’

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी सुरू

“८०-८५ वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचे काम करावे”, अजित पवारांचा शरद पवारांना नाव न घेता सल्ला

सुरेश वाडकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये अजित पवार यांना एक विनंती केली. ते म्हणाले, “नाशिकमध्ये खूप प्रतिभावान मुले आहेत. अनेक नाशिकची मुलं गाणं शिकण्यासाठी, माझ्याकडे मुंबईला येतात. मात्र सगळ्यांनाच मुंबईला येणे आणि राहणे शक्य होत नाही. त्यामुळेच नाशिकमध्ये एक संगीत शाळा काढावी अशी माझी इच्छा होती, किंबहुना अजूनही आहे. म्हणूनच मी इथे जागा घेत होतो. मात्र मला जागेच्या व्यवहारज्ञानबद्दल असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे माझी फसवणूक झाली. ही गोष्ट खूपच गाजली. तुम्हाला (अजित पवार) तर हे सर्व माहित आहे.”

पुढे वाडकर म्हणाले, “संगीत शाळा काढण्याचे माझे स्वप्न आहे. या स्वप्नाचे माझे ९० टक्के काम झाले असून, राहिलेले केवळ १० टक्के काम का होत नाही हे मलाच कळत नाही. हे काम अडकल्याचे माझे सर्वात मोठे दुःख आहे.” यासोबतच सुरेशजींनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांना विनंती करताना त्यांनी म्हटले, “मला यातून वाचवा. ‘काका मला वाचवा’ असे म्हटले गेले आहे, आता तसेच ‘दादा मला वाचवा’ असे म्हणायची वेळ माझ्यावर आली आहे. तुम्ही दोघं नक्की माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी मदत करा असे मी आज तुम्हाला आवाहन करतो.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी