34 C
Mumbai
Wednesday, November 15, 2023
घरमनोरंजनबोहल्यावर चढली अन् परिणीती चोप्राची चढ्ढा झाली

बोहल्यावर चढली अन् परिणीती चोप्राची चढ्ढा झाली

अखेर एका प्रेमाचे विवाहात रुपांतर झाले आहे. परिणीती चोप्राचे दोनाचे चार हात झाले आहेत. आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या बेडीत परिणिती चोप्रा अडकली आहे. परिणीतीच्या विवाहामुळे बॉलीवूडमधील आणखी एक अभिनेत्री राजकीय नेत्याची पत्नी झाली आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर परिणीती लग्नाच्या बेडीत अडकणार हे नक्की नक्की झाले होते. पण लग्नाची तारीख कोणती असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकता रविवारी 24 सप्टेंबर रोजी संपली. परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा शुभविवाह राजस्थानच्या उदयपूरमधील एका शाही हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. आणि त्यांचे फोटो परिणीतीने आज तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. राघव चढ्ढा ‘आप’चे नेते असल्यामुळे अरविंद केजरीवाल लग्नाला आवर्जून उपस्थित होते.

हा खरोखरच शाही विवाह म्हणावा लागेल. एक-दोन नाही तर तब्बल 18 बोटींमधून त्यांच्या लग्नाची मिरवणूक काढण्यात आली होती. रविवारी दुपारी साडेतीन वाजता उदयपूरमधील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा जयमाला सोहळा झाला. त्यानंतर दोघांनी आता एकमेकांना आयु्ष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेत सप्तपदी घेतली.

लग्नाचा आनंद परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या चेहऱ्यावर पुरेपूर दिसत होता. दोघांची शाही वेशभूषाही साजेशी होती. वऱ्हाडी मंडळींमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, परिणीती चोप्राची जवळची मैत्रिण आणि टेनिसपटू सानिया मिर्झा, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदी आवर्जून उपस्थित होते. या शिवाय राजकीय आणि बॉलीवूडमधील अनेक मान्यवर या नवदांपत्यास आशीर्वाद देण्यासाठी आले होते. काही कारणास्तव करण जोहर लग्नाला उपस्थित राहू शकला नाही. पण आमंत्रण दिलेले बहुंताश सेलिब्रेटींनी लग्नाला हजर होते. त्यामुळे या विवाहाची चर्चा कालपासून चर्चा होत आहे.

हे ही वाचा

अरिजितच्या आवाजातील ‘आशिकी 3’ चे गाणे लिक, सोशल मिडियावर झाले वायरल!

3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

आपल्या अपंग फॅनचं प्रेम पाहून शाहरुखही भारवला!

वास्तविक परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा यंदा मे महिन्यात झाला होता. त्यानंतर दोघे विवाहबंधनात कधी अडकणार याची चर्चा सुरू होती. अखेर 24 सप्टेंबरचा मुहूर्त ठरला. गेल्याचट आठवड्यात दोघांनी दिल्लीत भव्य सुफी नाईटचे आयोजन केले होते

प्रियंका चोप्राची अनुपस्थिती
या लग्नाला प्रियंका चोप्राची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय होता. प्रियंका आणि परिणीती या चुलत बहिणी. पण बहिणीच्या लग्नाला प्रियंका नव्हती. यावर ती कामात खूप बीझी असल्यामुळे येऊ शकली नाही, असं प्रियंकाची आई मधू यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी