26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीय उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भाजपचा विश्वासघात केला- नड्डा

 उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भाजपचा विश्वासघात केला- नड्डा

टीम लय भारी 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झाला. आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यापासून शिवसेनेवर भाजपचे आरोप सुरुच आहेत. जे.पी. नड्डा यांनी एका मुलाखतीत शिवसेनेवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. काँग्रेससोबत तुम्ही निवडणूक जिंकता, मात्र जे राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जिंकताना कष्ट घ्यावे लागतात. त्यावर जे.पी. नड्डा म्हणाले “महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर आमच्यासोबतच निवडणूक लढले होते. महाराष्ट्रात आम्ही हरलो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. सत्तेसाठी भाजपाचा विश्वासघात करण्यात आला. महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलो होतो. फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच जनमताचा कौल होता. ” असं नड्डा यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेमधील समसमान सत्ता वाटपावरून भाजपाने शिवसेनेचा फॉर्म्यूला मान्य न केल्यामुळे शिवसेनेने भाजपवर विश्वासघात केल्याचा आरोप करुन भाजपसोबत काडीमोड घेतली होती. भाजपला १०५ शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद यावरुन वाद झाला होता. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी तयार होऊन महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्त्वात आलं.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून शिवसेना विरुध्द भाजप असा संघर्ष सुरुच आहे. आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष  जे.पी.नड्डा यांनी भाजपाची हार महाराष्ट्रात झालेलीच नाही असं म्हटलं आहे. सत्तेसाठी आमच्यासोबत विश्वासघात करण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी तो केला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी