30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिन द्यायची गरज; उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिन द्यायची गरज; उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी मुंबईत साजरा केला. दोन्ही गटांचे असंख्य कार्यकर्ते आज मुंबईत दाखल झाले होते. ठाकरे यांच्या गटाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, मणिपुरमध्ये जा असे मी बोललो तर मला बोलतात की सूर्यावर थुंकू नका जर मग हे सूर्य आहेत तर माणिपूरमध्ये हे का उगवत नाहीत…? अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. ते पुढे म्हणाले, सीरिया आणि लिबिया सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहेत अशी माहिती आपले लेफ्टनंट जनरल निशिकांत यांनी दिली. सीरियाचा हुकुमशहाची शेवटी काय परिस्थिती झाली सर्वांना माहीत आहे, त्यांना शेवटी गटारामध्ये लपून बसायची वेळ आली. तिथे भाजपवाले असले तरीही मारले जाऊ नये हे आमचं हिंदुत्व आहे.

काल देवेंद्र फडणवीस यांनी हास्य जत्रेचा प्रयोग केला तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. कोविडची लस मोदीजींनी शोधून काढली मग बाकीचे संशोधक गवत उपटत बसले होते का ? मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिन द्यायची सध्या गरज आहे. मानसिक रुग्णांना समीर चौगुले यांच्या दवाखान्यात पाठवले पाहिजे, सगळे अवली आहेत. लवली इथे कोणीच नाही. तुम्ही अवली असले तरी जनता तापली आहे. असे ठाकरे यावेळी म्हणाले.

सुरुवातीला ठाकरे म्हणाले, आज आपल्या शिवसेनेला ५७ वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजही जोश ताकत आपल्यामध्ये अजूनही आहे शिवसैनिकांची अफाट गर्दी जमलेली हॉल भरलेला आहे आणि दुसऱ्या टोकाला गारदी जमलेले आहेत. गर्दी शब्दाचा अर्थ असा की पेशवे काळात लढाई करताना गोंधळ घालण्यासाठी वसूली करण्यासाठी ठेवलेली टोळी.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही सत्ता चालवायला नालायक ठरलाय. हिंदू आक्रोश करत आहेत काश्मीर मध्ये अजूनही हिंदू मारले जात आहेत. देशाचे शत्रू संपवा तुम्ही राजकारणामध्ये शत्रू संपवत निघालेले आहात. लेफ्टनंट जनरल निशिकांत सिंग यांनी तिथली परिस्थिती ट्विटरवर ट्विट केलेली आहे हे मी नाही बोलत आहे, असे ठाकरे यांनी केंद्रीय नेतृत्वाला सुनावले.

शिंदे गटाला सुनावताना ठाकरे म्हणाले, कोर्टाचा निकाल लागलेला आहे. त्यामुळे यांना ट्रॅव्हल्स कंपनी काढायला सोपे जाईल. गुजरातला गेल्यावर कुठे रहायचे ? गुवाहाटीला कुठे रहायचे ? दिल्लीत गेल्यावर मुजरा कसा करायचा ? हा सर्व अनुभव गाठीशी आलेला आहे. इतका अनुभव आलेला आहे की, त्याच्या गाठी झालेल्या आहेत गुजरातला गाठीशेव खात आहेत. रक्त सांडून घाम गाळून शिवसैनिकांनी तुम्हाला उभ केल होता आयत्या बिळावर तुम्ही नागोबा झालेला आहात. भाजपवाले तुम्हाला दूध पाजतील, पुंगी वाजवतील, टोपलीत घालतील आणि देतील सोडून, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, हे सत्तेत आल्यापासून जाहिरातींवर जेवढा खर्च झालेला आहे तेवढा खर्च शेतकऱ्यांना दिला असता तरी आपल्या बळीराजाचं संकट दूर झाल असतं.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या अनियमिततेची एसआयटी चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्याला यश; तळीयेतील ६६ दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे

भगतसिंग कोश्यारी यांना दानवेंचे शुभेच्छा पत्र; ‘जागतिक गद्दारी दिना’साठी ‘युनो’कडे प्रयत्न करण्याची मागणी

जिकडे आव्हान आहे तिथे शिवसेना, जिथे शिवसेना आहे तिथे आव्हान हे असंलच पाहिजे. आपल्याला आव्हान पेलत जायचं आहे परंतु हे आव्हान आपल्याला संपवायचे आहे आणि हे शेवटचं असणार आहे. आपल्याला हा शत्रू संपवायचा आहे. उद्या एक वर्ष पूर्ण होईल गद्दारपणाला कारण उद्या गद्दार दिन आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, आजही काहीजण जात आहेत, आणि कोणी जात असेल तर जाऊ द्या. शिवसेनेला काही धक्का वगैरे बसत नाही. अस्वलाचा एक केस उपटला म्हणून असं टकलं होत नाही. अजूनही जर कोणी भाडोत्री असतील तर ते पण तुम्ही घेऊन जा. माझ्याकडे यादी पाठवा आणि घेवून का मी पाठवतो. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी