27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसांच्या कमी वयाच्या पुतण्याला लस, जितेंद्र आव्हाडांचा दोन शब्दात तन्मयला टोला...

देवेंद्र फडणवीसांच्या कमी वयाच्या पुतण्याला लस, जितेंद्र आव्हाडांचा दोन शब्दात तन्मयला टोला…

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट असून, सत्ताधारी आणि विरोधक या संकटाच्या काळातही एकमेकांवर चिखलफेक करण्यात गुंतलेत आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या २५ वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचे वादळ उठले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्वीट करत दोनच शब्दात टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू तन्मय फडणवीस यांचा लस घेताना फोटो व्हायरल झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. पण त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “धन्यवाद तन्मय!” या दोनच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर प्रश्न

एक मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु त्याआधीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली, हा प्रश्न विचारला जात आहे. तन्मय यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नाही, ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत, मग त्यांना कोरोनाची लस कशी मिळाली, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. “चाचा विधायक है हमारे” या प्रसिद्ध विनोदी सीरीजच्या नावावरुनही काही जणांनी टीका केली आहे.

कोण आहेत तन्मय फडणवीस?

  • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे
  • माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू
  • अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
  • नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन

काँग्रेसचा हल्लाबोल

“४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असे असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडे मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का?” असा सवाल काँग्रेसच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आला आहे.

“तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिव्हीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का?” असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. आता जनतेच्या प्रश्नावर फडणवीस मौन सोडणार का, हा सवाल विचारला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी