30 C
Mumbai
Sunday, June 30, 2024
Homeराजकीयसरंजामी मराठा नेतृत्वाचा आरक्षणाला विरोध असल्याने लाठीचार्ज; वंचितचा आरोप

सरंजामी मराठा नेतृत्वाचा आरक्षणाला विरोध असल्याने लाठीचार्ज; वंचितचा आरोप

गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे, मात्र आतापर्यंत कोणत्याच सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात यश आलेले नाही. त्यामुळे मराठा समाज कंमालीचा संतप्त झाला आहे. वारंवार आंदोलने, मोर्चे, उपोषण करुन देखील सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जुरंगे-पाटील उपोषणाला बसले होते. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी काल पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

वंचित बहुजन आघाडीने देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रखा ठाकुर यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. सरंजामी मराठा नेतृत्वाचा या आरक्षणाला विरोध असल्या मुळेच हा लाठीमार झाला आहे. लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या जालना व बीड येथे होणाऱ्या बंदच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी तर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा 
मराठा आंदोलनकर्ते संतापले; अहमदनगर, सोलापूरसह नंदुरबार जिल्ह्यात बसफेऱ्या बंद
एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्यावा; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
जालना लाठीचार्जप्रकरणी भाजपाने माफी मागावी: सुप्रिया सुळे

रेखा ठाकूर म्हणाल्या की, जालना येथे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गरीब मराठा आंदोलक उपोषणाला बसले होते. ह्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी निर्घृण लाठी हल्ला केला आहे. यामधे महिला आंदोलकांसह अनेकजण गंभिर जखमी झाले आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर केलेल्या या लाठी हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध करते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी