28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रCDS : भारताच्या ‍संरक्षणदल प्रमुख पदी अन‍िल चौहान यांची नियुक्ती

CDS : भारताच्या ‍संरक्षणदल प्रमुख पदी अन‍िल चौहान यांची नियुक्ती

भारताच्या संरक्षण दलातील सर्वोच्च पदावर अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल अन‍िल चौहान (निवृत्त) यांची भारत सरकारने संरक्षण दल प्रमुखपदी (Chief of Defense) नियुक्ती केली आहे.

भारताच्या संरक्षण दलातील सर्वोच्च पदावर अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल अन‍िल चौहान (निवृत्त) यांची भारत सरकारने संरक्षण दल प्रमुखपदी (Chief of Defense) नियुक्ती केली आहे. ते देशाचे दुसरे सीडीएस आहेत. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान 2021 मध्ये लष्कारातून सेवा निवृत्त झाले आहेत. माजी संरक्षण दल प्रमुख ब‍िपिन रावत यांचे पत्नी आणि 11 सहकाऱ्यांसह नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातामध्ये निधन झाले होते. ते पद रिक्त होते. ले.जनरल अनिल चौहान 1981 मध्ये 11 गोरखा रायफल्समध्ये नियुक्त झाले होते. आता संरक्षण मंत्रालयातील लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही ते काम करणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली न्युक्लियर कमांड अथॉरिटीचे लष्कारी सल्लागार म्हणून देखील ते काम करतील.

जून‍ महिन्यात त्यांच्या नावाची घोषणा केली होती. ते मे महिन्यात सेवानिवृत्त झाले होते. ते 61 वर्षांचे आहेत. देशाची पहिले सीडीएस (Chief of Defense) जनरल बिप‍िन रावत यांचे मागच्या वर्षी 8 डिसेंबरला तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले होते. त्यावेळपासून हे पद रिक्त होते. हे पद भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे प्रमुख पद आहे. सुमारे 10 महिने हे पद रिक्त असल्यामुळे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना बंडाची खेळी पडणार भारी

Pushpa of Nagpur : नागपूरचा ‘पुष्पा’ पोलिसांच्या जाळयात सापडला

Virus Crises : कोरोनानंतर ‘या’ व्हायरसने वाढवली पुन्हा धाकधूक

अनिल चौहान यांच्या नियुक्तीचे सर्वांनी स्वागत केले आहे. त्यांचा जन्म 18 मे 1961 रोजी झाला. ले.जनरल अनिल चौहान यांनी जम्मू-काश्मीर मधील अतिशय संवेदनश‍िल भाग बारामुल्लामध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी उत्तर आणि पूर्वेकडील प्रदेशात ले. जनरल असतांना उत्तम प्रकाराची सेवा बजावली आहे. त्यांना भारतीय सीमा भागात दहशतवदी कारवाया कशा होता. घुसखोरी कशी होते, या सगळयाचा चांगला अभ्यास आहे.

त्यांना भारतीय सैन्यदलातील कामाचा 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र मिशनवर देखील काम केले आहे. त्यांना भारत सरकार कडून उत्तम कामासाठी अनेक पदके मिळाली आहे. त्यामध्ये परम वि‍शिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशष्टि सेवा पदक, सेना पदक,‍ विशिष्ट सेवा पदक इत्यादी महत्त्वांची पदके प्राप्त झाली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी