33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयस्वातंत्र्य हवेय की ९० दिवस जेल, हे तुमचं तुम्ही ठरवा...ट्विटरच्या माध्यमातून...

स्वातंत्र्य हवेय की ९० दिवस जेल, हे तुमचं तुम्ही ठरवा…ट्विटरच्या माध्यमातून आव्हाड यांचा केंद्रावर निशाणा

स्त्री असो वा पुरुष कधीही जेलमध्ये टाकून द्या आणि न्यायालयाला सांगा की, ‘ह्यांच्यावर संशय आहे.’ ९० दिवस त्याला जेलमध्ये ठेवण्याची पूर्णपणे तरतूद करुन ठेवली आहे. जागे व्हा.. नाहीतर ९० दिवस जेलमध्ये बसा. यापैकी काय हवेय. स्वातंत्र्य की, ९० दिवस जेल. हे तुमचं तुम्ही ठरवा.. असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने ब्रिटिश काळापासून चालत आलेले सगळे कायदे बदलण्याचे विधेयक संसदेच्या पटलावर ठेवले आहे. त्यात देशद्रोह कायदा रद्द करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी करताना पूर्वी 4 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवता येतं होतं. पण आता एखाद्यावर आरोप झाल्यास ९० दिवस त्याला जेलमध्ये ठेवण्याची पूर्णपणे तरतूद केंद्राने केली आहे. त्यामुळे जनतेत नाराजी आहे. हाच धागा पकडून आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्राला खडेबोल सुनावले आहेत.

आतापर्यंत कुठल्याही गुन्ह्यासाठी जास्तीत-जास्त 14 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवता येतं होतं. आता मात्र सरकारला कुठल्याही गुन्ह्यामध्ये, तुमचा नुसता संशय जरी आला तरी तुम्हाला 3 महिने सरकारी कोठडीमध्ये काढावे लागतील. म्हणजे 90 दिवसांची सजा. काही करा अथवा नका करु. राज्य सरकार किंवा पोलिसांना वाटलं तर आपण ९० दिवस जेलमध्ये राहणारच. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ही बातमी यावी, हे या देशाचं दुर्दैव आहे. असेही आव्हाड यांनी ट्विट करून सांगितले आहे.
सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय; ७ वर्षांत आरोग्य खात्याने ११ हजार ५०२ कोटींच्या निधीला लावली कात्री
महाराष्ट्रातदेखील मणिपूरसारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न-राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
‘राष्ट्रपती पोलीस शौर्य’ पदकावर गडचिरोली पोलीस दलाची मोहर ; एकट्या गडचिरोलीत ३३ जवानांना पदके

सगळे मिळवून म्हणूया… स्वतंत्र भारत चिरायू होवो ! तोंडावर बोट ठेवूया… महात्मा गांधीजींकडे बघुया… आणि हे लढले होते असं फक्त मनातल्या मनात म्हणूया…!! कारण आपल्याला कोणाला लढायचचं नाही. स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कुठे द्यावी लागली..? ती तर त्यांनी दिली. आपल्याकडे आयतं आलेलं स्वातंत्र्य आपण हातातून घालवत आहोत. नवीन कायदे या देशाच्या मूळ ढाच्यालाच हात घालणार आहेत. स्त्री असो वा पुरुष कधीही जेलमध्ये टाकून द्या आणि न्यायालयाला सांगा की, ‘ह्यांच्यावर संशय आहे.’ ९० दिवस त्याला जेलमध्ये ठेवण्याची पूर्णपणे तरतूद करुन ठेवली आहे. जागे व्हा.. नाहीतर ९० दिवस जेलमध्ये बसा. यापैकी काय हवेय. स्वातंत्र्य की, ९० दिवस जेल. हे तुमचं तुम्ही ठरवा. असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी