29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई, चार अभियंत्यांना केले निलंबित

ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई, चार अभियंत्यांना केले निलंबित

टीम लय भारी

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेनी या रस्त्यांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले होते. त्यांनतर ठाणे महानगर पालिकेने संबंधित चार अभियंतांना निलंबित केले आहे (Thane Municipal Corporation taken major action).

निलंबित अभियंतांमध्ये उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजवण्यात या चार अभियंतांना अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

खेड्यातील स्ट्रीट लाईटचे कनेक्शन पुन्हा जोडल्याबद्दल महाराष्ट्र सरपंच परिषदेने मानले अजित पवारांचे आभार

जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा कामाचा सपाटा, रात्री १०:३० वाजता घेतली जलसंपदा विभागाची बैठक

मात्र पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली, परंतु रस्त्यांच्या संबंधित असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार ? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर रायगड, ठाणे आणि पालघर येथील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेले खड्डे आम्ही दूर करू असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दारू कारखान्यावर छापा, 17 लाख रुपयांचा माल जप्त

Maharashtra: Thane registers 292 new Covid-19 cases, 4 more deaths

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी