31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र'नरेंद्र मोदींकडे भीक मागत नाही'

‘नरेंद्र मोदींकडे भीक मागत नाही’

टीम लय भारी

अलिबाग : केंद्र सरकारवर सध्या महेश तपासे यांनी प्रश्नांची सरबत्ती चालवली आहे. आमच्या हक्काचा परतावा मागतो, भीक मागत नाही अशा विखारी शब्दांत आपली नाराजी उघड केली आहे. जीएसटी परतावा, लसी, इमपीरिकल डेटासोबतच पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीवरून प्रश्न केले आहेत (BJP, Mahesh Tapase is currently running a barrage of questions on the central government).

सत्ता दिल्यास चार महिन्यात इमपीरिकल डेटा सादर करतो असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना महेश तपासे यांनी प्रतिप्रश्न केला आहे. आता सत्ता हातात नाही परंतु जेव्हा सरकार भाजपचे होते तेव्हा हा मुद्दा गौण का वाटला अशा अशयासह तपासे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘वडील मजुरी करतात, अमेरिकेतील शिक्षणाचा विचारही केला नव्हता’

जितेंद्र आव्हाडांनी म्हाडाची ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख केली जाहीर

BJP
‘नरेंद्र मोदींकडे भीक मागत नाही’

डेटा मिळविण्याचे आदेश यापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिले होते. परंतु भाजप चे सरकार असताना 2018 मध्ये हे अधिकार मागे घेण्यात आले होते. ते का काढून घेण्यात आले याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायला हवेत असे तपासे म्हणाले.

सामान्य माणूस जीएसटी भरतो त्याचा परतावा मिळायलाच हवा, परतावा म्हणून आम्ही भीक मागत नाही तर आमच्या हक्काचे पैसे मागतो असे महेश तपासे यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे आर्थिक नियोजन केले होते त्यामुळे राज्याला नुकसान भोगावे लागले माही असेही ते यावेळी म्हणाले.

जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचा झणझणीत आरोप महेश तपासे यांनी केला आहे. छप्पन टक्के आरक्षण लोकांना कसे देणार आहात असा सवाल त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

जाणून घ्या भारताच्या ‘जलपरीचा’ इतिहास

An Expert Explains: BJP vote share and caste census

लसीकरणाच्या मुद्द्यावरून इतर राज्ये केंद्र सरकारला दोषी धरत आहेत. आपल्या देशात लसींचा तुटवडा असताना इतर देशांना लसी देणे हा वादाचा मुद्दा आहे. लसींचा मुद्दा घेउन भाजपाची भुमिका वादग्रस्त राहिली आहे. ५ कोटी लोकांचे लसीकरण पुर्ण झाल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी स्पष्ट अहवाल समोर आलेला नाही.

पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहेत, प्रतिलिटर शंभरीच्यावर गेलेले पेट्रोलचे भाव आणि हजारी पार गेलेले गॅस सिलेंडर. परंतु जेवढी ओरड व्हायला हवी तेवढी होताना दिलत नाही. हे अतिरिक्त पैसे भाजप सरकार रोजगार निर्मितीसाठी देणार होते, ते रोजगार कुठे गेले असाही सवाल या पत्रकार परिषदेच्या वेळी महेश तपासे यांनी उपस्थित केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी