33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeटॉप न्यूजमोठी बातमी : शरद पवारांच्या भेटीला अजित पवार

मोठी बातमी : शरद पवारांच्या भेटीला अजित पवार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : चार दिवसांच्या महानाट्यानंतर शरद पवार व अजित पवार यांची अखेर भेट झाली आहे. अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या मलबार हिल येथील सिल्व्हर ओक या बंगल्यावर अजित पवार पोचले आहेत. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित आहेत.

ओबेरॉय हॉटेलमध्ये नुकतीच तिन्ही पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानंतर शरद पवार घरी परतले. शरद पवार घरी पोचताच अजित पवार सुद्धा तिथे तातडीने पोचले आहेत. आपल्या गाडीतून उतरताच अजितदादा अक्षरशः धावतच पवारांच्या घरात शिरले. घरात गेल्यानंतर त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतला. अजितदादांचे स्वागत करण्यासाठी तिथे सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे व कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा सुरू आहे. रात्री सव्वा नऊ वाजता अजितदादा हे शरद पवारांच्या घरी पोहचले होते.

मोठी बातमी : शरद पवारांच्या भेटीला अजित पवार मोठी बातमी : शरद पवारांच्या भेटीला अजित पवार

अजित पवारांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची शरद पवारांसोबत चर्चा होत आहे. यावेळी शरद पवार अजितदादांची समजूत काढतील. त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय होण्यासाठी सांगतील. मंत्रीपद घेण्यासाठीही सांगतील असे बोलले जात आहे. अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपसोबत सलगी केली होती. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. परंतु आज त्यांनी राजीनामा दिला. कुटुंबातील नातलगांनी अजितदादांची मनधरणी केल्यानंतर अजितदादांनी राजीनामा दिला. परंतु आपण राजकारणातून संन्यास घेण्याची भूमिका अजितदादांनी घेतली आहे. अजितदादांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न पवार करतील असेही बोलले जात आहे.

महाविकास आघाडीचे नेते राजभवनवर

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येऊ घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनवर पोहचले आहेत. यांत एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात या पक्षनेत्यांचा समावेश आहे. सरकार स्थापनेचा दावा हे तिन्ही नेते करतील असे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळ काय म्हणाले, अजित पवारांबद्दल…

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते

शरद पवारांनी शिवसेना स्टाईलमध्ये दिला ‘हा’ आदेश

नारायण राणेंच्या ‘पनवतीने’ फडणवीस सरकार बुडाले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी