27.5 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeटॉप न्यूजविश्वास ठेवणे आमचा कमकुवतपणा नाही, आमची संस्कृती; उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला

विश्वास ठेवणे आमचा कमकुवतपणा नाही, आमची संस्कृती; उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला

टीम लय भारी 

मुंबई : आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. “विश्वास ठेवणे ही आमचा कमकुवतपणा नाही, ती आमची संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन न जाये’ ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेना पक्ष प्रमुख सुद्धा लाचार होणार नाही. असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले,“अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे आम्हाला वादळाची परवा नाही,” असंही उध्दव ठाकरे म्हणाले.

घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आहे आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बिलकुल बदललेली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरा देवीच्या दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीचीही कमाल आहे,” असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

उध्र्दव ठाकरे म्हणाले, देशावर कोरोनाचा विचित्र संकट…

“कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. वादळ येऊ द्या चक्रीवादळ येऊ द्या किंवा कोणतंही संकट येऊ तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. कस्तुरबा रुग्णालय आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या. त्या आता त्यांची संख्या वाढवून आपण १०० लॅब केल्या आहेत आणि आपण लॅब आणखीन वाढवणार आहोत. शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. “डॉक्टरांना मास्क, पी पी ई किट, हॅन्ड ग्लोज यांसारख्या सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी