29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeटॉप न्यूजराष्ट्रीय क्रीडा दिनी पॅरालिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या चंदेरी गर्लची कहाणी

राष्ट्रीय क्रीडा दिनी पॅरालिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या चंदेरी गर्लची कहाणी

 

टीम लय भारी

टोकियो : टोकियो पॅरालिंपिकच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या भाविना पटेल हिला रौप्य पदक मिळाले. टेबल टेनिसच्या अंतिम सामन्यात हार पत्कारून तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या यिंग झोऊसोबत अंतिम लढाईत ११-७, ११-५, ११-६ अशा फरकाने तिचे सुवर्णपदक हुकले. टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारताला मिळालेले हे पहिलेच पदक आहे (Bhavina Patel of India won a silver medal in table tennis at the Tokyo Paralympics).

गुजरात मधील वडनगर येथील सुंडीया गावात राहणारी मुलगी तीन भावंडात सर्वात छोटी. तिचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. एक वर्षाची असताना चालण्याचा प्रयत्न करताना ती कोसळली. यातच तिच्या एका पायाला लखवा मारला. काही दिवसांनी तिच्या दुसऱ्या पायाला देखील याच आजारामुळे मारला आणि तिला कायमचे अपंगत्व आले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर भाविना पटेल कुबड्या घेऊन चालू लागली (Bhavina Patel started walking with crutches After the surgery).

‘निवडणुका लागल्या की महिलाशक्ती आठवते, सरकारचा कोडगेपणा’

Tokyo Paralympics : टेबल टेनिसपटू भाविना पटेलने इतिहास रचला, सुवर्णपदक जिंकण्यापासून एक पाऊल दूर

Bhavina Patel
भविना पटेल

संस्कृतमध्ये उच्च शिक्षण घेऊन ती दिव्यांग स्कूलमध्ये कॉम्पुटर शिकायची. त्यावेळेस गुजरातमधील पॅरा टेबल टेनिस कोचने तिला प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव सुरु केला. तिथून तिने जी सुरुवात केली त्यापुढे तिने २७ वेगवेगळ्या देशात अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. स्पोर्ट्स कोट्यातून तिला पुढे बिमा निगममध्ये नोकरी मिळाली. विवाहानंतर तिच्या सासरच्या मंडळीनी देखील तिला पुढे खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.

आदित्य ठाकरेंचा मनाचा मोठेपणा ,जनतेकडेच मागितला सल्ला

Tokyo Paralympics 2021 Live Updates: Paddler Bhavina Patel wins historic silver medal

बालपणापासून संघर्षमय जीवन जगणाऱ्या या रणरागिणीने जिद्दीच्या जोरावर इतिहास घडविला. साऱ्या देशाला तिच्या खेळाचा आज अभिमान आहे. टेबल टेनिसमध्ये असा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. पंतप्रधानांनी देखील तिच्या या कार्याचे कौतुक केले आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी