28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजदारूतून राज्य सरकारला मिळाला 7565 कोटीचा महसूल

दारूतून राज्य सरकारला मिळाला 7565 कोटीचा महसूल

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ काळात राज्य सरकारचे उत्पन्न घटले आहे. पण या वाईट काळातही राज्य उत्पादन शुल्क विभागाने ( एक्साईज ) सरकारला मोठा हातभार लावला आहे. ‘कोरोना’ काळात या विभागाने दारूतून तब्बल 7565 कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळवून दिला आहे (Excise department collected Rs 7565 Cr. revenue from liquor) .

एप्रिल ते 26 नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत हा महसूल जमा झाला आहे. अर्थात ‘कोरोना’मुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा महसूल कमीच आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 9768 कोटी रुपये महसूल जमा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2203 कोटी रुपये कमी महसूल जमा झाल्याचे आयुक्त कांतीलाल उमाप ( IAS Kantilal Umap ) यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

ऑक्टोबरपासून महसूलात वाढ

मार्चमध्ये ‘कोरोना’चे आगमन झाले. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच, म्हणजे एप्रिलमध्ये मद्यावरील कराचा महसूल घटला. जुलैपासून महसूलात बऱ्यापैकी वाढ झाली. मात्र ऑक्टोबर महिन्यातील महसूलात गेल्या वर्षापेक्षाही यंदा मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे उरलेल्या पाच महिन्यांत अशीच वाढ झाली तर मार्च अखेर एकूण 14 हजार कोटी रुपये महसूल प्राप्त होईल असा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल;शिवसेनेने भाजपाला डिवचले

राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मद्य उत्पादन करातून महिनानिहाय मिळालेला महसूल ( सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये )

                2019           2020

एप्रिल        1097           297

मे           1410           581

जून             1180           811

जुलै         1241           1145

ऑगस्ट      1209           1008

सप्टेंबर      1284           1140

ऑक्टोबर     1186           1390

नोव्हेंबर      710 (18 नोव्हें. पर्यंत)  822 (18 नोव्हें. पर्यंत)

महसूलाचे उद्दीष्ट ( सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये )

सन              उद्दीष्ट            साध्य

2019 – 20    17,977          15,429

2020 – 21    19,225          7,565

कोरोना काळात 27 कोटी लिटर दारूचा खप

‘कोरोना’ काळात 27 कोटी लिटर दारूचा खप झाला आहे.  यांत 12. 24 कोटी, परदेशी 7.61 कोटी, बियर 6.72 कोटी लिटर दारूचा समावेश आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असल्याचे उमाप यांनी सांगितले.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी