33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजगुजरातमध्ये मांसाहारी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बंदी, मुख्यमंत्री पटेल यांनी दिले स्पष्टीकरण

गुजरातमध्ये मांसाहारी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बंदी, मुख्यमंत्री पटेल यांनी दिले स्पष्टीकरण

टीम लय भारी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील सार्वजनिक रस्त्यांवरील मांसाहारी खाद्यपदार्थ स्टॉलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अहमदाबाद महानगरपालिकेने सार्वजनिक रस्ते, शाळा आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटर अंतरावरील मांसाहारी पदार्थांचे स्टॉल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे स्टॉल धारकांना आपली रोजीरोटी गमवावी लागण्याची भीती आहे (Gujarat, ban on non-vegetarian food stalls).

पालिकेच्या या निर्णयाचे स्पष्टीकरण खुद्द गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले आहे. ‘ राज्य सरकारला लोकांच्या खाद्यपदार्थांच्या सवयींबद्दल कोणतीही अडचण नाही. केवळ स्वछता आणि लोकांना येणाऱ्या अडचणी या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लोक शाकाहारी खावोत किंवा मांसाहारी पदार्थ भाजप सरकारला त्याचा काहीही त्रास नाही.

चार युद्धाचे साक्षीदार : शांताराम शिंदे

पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्याला ठेकेदारांकडून हवेय २० टक्के कमिशन

केवळ खाद्यपदार्थांच्या गाड्यांमधून विकले जाणारे खाद्यपदार्थ अस्वच्छ आणि नागरिकांसाठी हानिकारक नसावे, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

धमकी देऊन न्याय मिळत नाही, चर्चेने प्रश्न सोडवू : अनिल परब

Ahmedabad to remove stalls selling non-vegetarian food on main roads

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी