35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजन'ही माती नाही, शेण आहे,' म्हणत सोनू सूदच्या फोटोवर नेटकऱ्यांची मजेशीर टिपणी

‘ही माती नाही, शेण आहे,’ म्हणत सोनू सूदच्या फोटोवर नेटकऱ्यांची मजेशीर टिपणी

टीम लय भारी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर नेहमीच प्रचंड सक्रिय असतो. तो सोशल मीडियाद्वारे गरजूंची मदत करताना करताना दिसतो. त्याच्या या मदत करण्याच्या वृत्तीमुळे तो अनेकांसाठी देव बनला आहे. मात्र सोनूने ट्विट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी मजेशीर टिपणी केली आहे(Sonu Sood shared photo talking about soil of Punjab)

सोनू सध्या पंजाबमध्ये आहे. पंजाबच्या मातीविषयी बोलत त्याने दोन फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये सोनू शेणाच्या गोवऱ्यांच्या ठिकाणी बसलेला दिसत आहे. परंतु, या फोटोंना मजकूर देताना त्याने, ‘मेरे पंजाब दी मिट्टी दी खुशबू’ असे लिहिले आहे. त्यामुळेच सोनूला त्याच्या फोटो कैप्शनमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Entertainment : इनडोअर खेळांसह चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होणार, राज्य सरकारची अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध

राजकुमार आणि पत्रलेखा यांचा लग्नातला फोटो वायरल,दोघांच्या लूकची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा

एका यूजरने सोनू सूदची खिल्ली उडवत ही माती नाही सर हे शेण आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने म्हटले की, ‘ सर, तुम्ही ज्याला माती समजत आहात ते खरं तर शेण आहे, असे म्हटले आहे.

सोनू सूद लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटात तो महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सोनू सोबत अक्षय कुमार, मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Dance Deewane : वर्णभेदाच्या व्हिडीओवर राघव जुयाल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, राघवने दिले याबाबत स्पष्टीकरण

Sonu Sood की बहन है बेहद खूबसूरत, फिल्मी बालाओं को देती हैं टक्कर…इस मामले में भाई से भी आगे- Pics

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी