30 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजBreaking : आयएएस अधिकाऱ्यालाच झाली ‘कोरोना’ची लागण, महाराष्ट्रात अकरावा रूग्ण आढळला

Breaking : आयएएस अधिकाऱ्यालाच झाली ‘कोरोना’ची लागण, महाराष्ट्रात अकरावा रूग्ण आढळला

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या कालपर्यंत 10 होती. आता ती अकरावर पोचली आहे. विशेष म्हणजे, अकरावा रूग्ण आयएएस अधिकारी आहे. विदर्भात जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांना नागपूरमधील सरकारी रूग्णालयात भरती करण्यात आल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना संपर्क साधला असता, ‘कोरोना’ची लागण झालेला अकरावा रूग्ण नागपूरात आढळला आहे. ही माहिती खरी आहे. परंतु हा रूग्ण आयएएस अधिकारी असल्याबाबत मला कल्पना नाही नाही, असे ते म्हणाले.

संबंधित अधिकाऱ्यांची बुधवारी रात्री उशिरा तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर नागपूरमधील सरकारी इस्पीतळात सध्या उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना संपर्क साधला असता, ‘कोरोना’ची लागण झालेला अकरावा रूग्ण नागपूरात आढळला आहे. ही माहिती खरी आहे. परंतु हा रूग्ण आयएएस अधिकारी असल्याबाबत मला कल्पना नाही नाही, असे ते म्हणाले.

याबाबत आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, नागपूरमध्ये एक कोरोना रूग्ण आढळला आहे. ते अमेरिकेवरून आले होते. पण त्यांचे नाव किंवा अन्य वैयक्तिक माहिती याबाबतचा तपशील आम्ही देऊ शकत नाही.

करोनामुळे अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय 

महाराष्ट्रात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात आठ 8, तर मुंबईत 2 रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून आली नसून त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सतर्कता बाळगावी, असे आवाहन करतानाच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन क्षेत्रिय स्तरावर असावे यासाठी विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल. विना प्रेक्षक आयपीएल सामन्यांसंदर्भात कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

करोनाबाबत राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती देण्यासाठी विधानभवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 40 जणांचा समूह दुबईहून भारतात आला. त्यातील बाधा झालेल्यांपैकी 10 जण आहेत. त्यातील सर्वांशी संपर्क झाला असून 3 व्यक्ती कर्नाटकच्या आहेत. या समूहातील चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

नागरिकांनी घाबरुन न जाता सार्वजनिक कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळावी. परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तींनी 14 दिवस घरामध्ये थांबावे. राज्य शासन कोरोनासंदर्भात दर दोन तासांनी आढावा घेत आहे. खासगी प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. अतिशय जबाबदारीने काम करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेला केंद्राच्या परवानगीनंतरच चाचणीचे काम दिले जाईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना नागरिकांमध्ये जाता यावं, त्यांना दिलासा देता यावा यासाठी अधिवेशनाचे कामकाज शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधापरिषद उपसभापती, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, गटनेते यांच्या बैठकीत घेण्यात आला  असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयपीएल सामने विनाप्रेक्षक खेळविण्याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नियमाच्या अधीन राहून कामकाज पूर्ण करणार : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकप्रतिनिधी, अधिकारी आपआपल्या भागात राहण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. यासंदर्भात गुरूवारी दोन्ही सभागृहात संसदीय कार्यमंत्री निवेदन करतील. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम, विविध परिषदा, मेळावे, सभा आदी कार्यक्रम रद्द करावेत. पर्यटनाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या समूहाने त्यांच्या परतीबाबत आरोग्य यंत्रणेशी संपर्कात रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात विलगीकरण कक्षात 700 खाटा : राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालये, महापालिका रुग्णालये येथेही विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरातील रुग्णालयांमध्ये देखील स्वतंत्र खाटा करण्यात आल्या असून अशाप्रकारे 650 ते 700 खाटा उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाने डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे.  हे प्रशिक्षित डॉक्टर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांना तीन दिवस प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणाला कालपासून सुरूवात झाली आहे. रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांकरिता वैयक्तिक संरक्षण किटची उपलब्धता असून पुरेसे व्हेंटिलेटर आणि औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

टीम लय भारी

शरद पवारांचा गौप्यस्फोट : आमच्या ‘त्या’ चुकीमुळे मुंबईसह देशात 1992 मध्ये धार्मिक दंगली घडल्या

शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचे ‘या कारणा’साठी केले कौतुक

आश्विन मुद्गल, श्वेता सिंघल, सुनील चव्हाण यांच्यासह आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी