30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeटॉप न्यूजक्रिकेट संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर चर्चा

क्रिकेट संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर चर्चा

टीम लय भारी

मुंबई : भारत विरूद्ध इंग्लड ( IND vs ENG ) यांच्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना आजपासून चेन्नईमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या भारतीय संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाली ( Virat Kohli revealed discussion before IND vs ENG match ).

भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली यानेच ही माहिती दिली ( Virat Kohli told that, there was discussion on #FarmersProtest in the team meeting ).  बैठकीनंतर पत्रकारांनी कोहली यांना शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाल्याचे विराट कोहलीने कबूल केले.

‘देशातील महत्वाच्या घडामोडींवर आमच्या बैठकांमध्ये चर्चा होत असते. शेतकरी आंदोलनाबाबतही खेळाडूंनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर सामन्याच्या ( IND vs ENG ) व्यूहरचनेबाबत चर्चा झाली’ – विराट कोहली

क्रिकेट खेळाडूंवर जनतेची नाराजी

रिहाना ( Rihanaa ), ग्रेटा थनबर्ग ( Greta Thunberg ) अशा परदेशी सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट्स केले आहेत. या ट्विट्सना प्रत्युत्तर देण्याच्या अनुषंगाने व मोदी सरकारला फायदेशीर ठरतील असे ट्विट आजी माजी खेळाडूंनी केले आहेत.

हे सुद्धा वाचा

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, लता मंगेशकरांवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार

नाना पटोलेंनी दिला विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा

IND vs ENG 1st Test LIVE: 11 महीने बाद भारत में होगी इंटरनेशल क्रिकेट की वापसी

IND vs ENG : Joe Root Says “Fantastic” Cheteshwar Pujara Will Be “Huge Wicket For Us”

विराट कोहली, रोहित शर्मा ( Rohit Sharma ), शिखर धवन ( Shikhar Dhawan ), अजिंक्य राहणे या विद्यमान खेळाडूंसह कोच रवी शास्त्री यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विटस् केले आहेत. त्यावर मोदी समर्थकांनी कौतुक केले. पण शेतकरी समर्थकांनी या खेळाडूंना सोशल मीडियात झोडपून काढले आहे.

रोहित शर्माचे ट्विट मोदी सरकारच्या समर्थनार्थ होते. तरीही कंगना रनौतने रोहितवर दुगाण्या झाडल्या ( Kangana Ranaut slams to Rohit Sharma ). कंगनाने रोहितसह सर्व क्रिकेटपटूंची संभावना ‘धोबी का कुत्ता…’ अशी केली. याच ट्विटमध्ये शेतकऱ्यांविषयी सुद्धा कंगनाने अतिरेकी असा उल्लेख केला. ‘ट्विटरने निश्चित केलेल्या आचारसंहिते’चे उल्लंघन होत असल्याने हे ट्विट डिलिट केल्याचे ट्विटरने नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर ( IND vs ENG ) खेळाडूंच्या बैठकीत गरमागरम चर्चा झालेली असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संघाविषयी विराटने सांगितले 5 मुद्दे

  • रोहित शर्मा आणि शुभमन गिलने ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून या सामन्यात ( ING vs ENG ) चांगल्या सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे.
  • अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात कप्तान या नात्याने चांगली भूमिका निभावली. मैदानात व मैदानाबाहेरही रहाणेसोबत माझे चांगले संबंध आहेत.
  • ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून या सामन्यात ( ING vs ENG ) जबाबदारी पार पाडणार आहे. मागच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. तो मॅच विनर म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडत आहे.
  • चेन्नईची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोयीची दिसत आहे. सुरूवातीला जलद गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. परंतु कुलदीप यादव आमच्या व्यूहरचेना महत्वाचा भाग आहे. त्याने गोलंदाजीवर चांगली मेहनत घेतली आहे.
  • जसप्रीत बुमराह देशातील पहिला कसोटी सामना ( ING vs ENG ) खेळण्यास उत्सुक आहे. ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या समावेशाने आमचा बॉलिंग अटॅक आणखी तिखट होईल.

विराट – रोहित एक वर्षानंतर एकत्र खेळणार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) शेवटच्या दोन कसोटी सामन्यांत रजा घेतली होती. दौऱ्यातील अन्य सामन्यांमध्ये विराट कोहलीने नेतृत्व केले होते. पण अन्य सामन्यांमध्ये रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) सहभाग नव्हता. शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहित खेळला होता.

ING vs ENG
विराट आणि रोहित 372 दिवसानंतर IND vs ENG सामन्यात एकत्र खेळणार आहेत

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याअगोदर कोरोना काळात सर्व आंतरराष्ट्रीय सामने रद्द झाले होते. 29 जानेवारी 2020 रोजी भारत विरूद्ध न्यूझिलंड हा सामना झाला होता. या सामन्यात विराट व रोहित एकत्र खेळले होते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांत विराट व रोहित एकत्र खेळले नव्हते. त्यामुळे तब्बल 372 दिवसानंतर विराट व रोहित एकत्र खेळताना दिसणार आहेत ( Virat Kohli and Rohit Sharma playing together after 372 days in IND vs ENG match ). विराट व रोहित हे दोघेही जागतिक अव्वल खेळाडू आहेत. ते जेव्हा संघात एकत्र खेळतात तेव्हा जिंकण्याची शक्यता 8 टक्क्यांनी वाढते. त्या पार्श्वभूमीवर या दोघांच्याही खेळाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

IND vs ENG खेळणार 12 सामने

भारत व इंग्लंड ( IND vs ENG ) यांच्यात पुढील तीन महिने मोठ्या संख्येने सामने होणार आहेत. तब्बल चार कसोटी, पाच T20  व तीन एक दिवसीय सामने दोन्ही संघात खेळले जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरेल. चेन्नई, अहमदाबाद व पुणे या ठिकाणी हे सामने होतील.

IND vs ENG match starts from today

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी