27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजसचिन तेंडूलकर, विराट कोहली, लता मंगेशकरांवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, लता मंगेशकरांवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार

टीम लय भारी

मुंबई : यशाच्या शिखरावर पोचलेल्या अनेक मान्यवरांनी नरेंद्र मोदी सरकारचे लांगूलचालन सुरू केले आहे ( Indian celebrities stands for Modi government ). या मान्यवरांवर आता सोशल मीडियातून जोरदार टीका होऊ लागली आहे.

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, अजय देवगण, सुनील शेट्टी अशा मान्यवरांवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

दिल्लीमध्ये गेले दोन महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारने ( Modi Government ) आणलेल्या तीन शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलक आक्रमक आहेत. या आंदोलकांचे ( Farmers Protest ) म्हणणे ऐकणे सोडाच, पण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बाजू घेत आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना  ( Rihanna ) हिने एक ट्विट केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी ग्रेटा थंडबर्ग  यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. मोदी सरकारने ( Modi Government ) या आंतरराष्ट्रीय मान्यवरांवर टीका केली आहे.

Indian celebrities stands for Modi government
रिहानाच्या ट्विटनंतर भारतीय सेलेब्रिटींनी टीकेचा भडीमार सुरू केला आहे

रिहाना व ग्रेटा यांच्या ट्विटनंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून जोरदार पाठींबा मिळू लागला आहे. शेतकरी नेत्यांनीही रेहाना व ग्रेटा यांचे आभार मानले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘लाल वादळ’ मुंबईत दाखल, मोदी सरकारविरुद्ध शेतक-यांचा एल्गार

अजित पवार बिरोबा देवस्थानासाठी वाढीव निधी देणार, दत्तात्रय भरणे यांचा पुढाकार

Rihanna and Greta prompt an MEA outburst — and a hashtag firestorm

देशाबाहेरील लोकांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये अशा आशयाचे ट्विट सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, अजयण देवगण, सुनील शेट्टी, अक्षयकुमार अशा मान्यवरांनी केले आहेत.

गेली दोन महिने शेतकरी थंडीत कुडकडत आंदोलन करीत आहेत. पण शेतकऱ्यांच्या बाजूने अवाक्षरही न काढणारे हे मान्यवर मोदी सरकारच्या ( Modi Government ) समर्थनार्थ टिवटिव करू लागले आहेत. या मान्यवरांवर आता सोशल मीडियातूनही जोरदार टीका सुरू झाली आहे.

https://twitter.com/raba_hussain/status/1357016396018774016?s=20

Sachin Tendulkar, Virat Kohli, Lata Mangeshkar, Ajay Devgan stands for Modi Government

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी