28.2 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजकालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष, उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष, उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती राज्यपालांनी केली आहे. उद्या एक दिवसासाठी आयोजित केलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष असतील. राज्यपालांनी काही वेळापूर्वीच कोळंबकर यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.

कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष, उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची उद्याच शपथ घेतील, अशी शक्यता आहे. हे नवे सरकार उद्या विधानसभेच्या बहुमत चाचणीला सामोरे जाईल. राज्यपालांनी उद्या सकाळी ८ वाजता विधानसभेचे अधिवेशन बोलाविले आहे.

कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष, उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘महाविकास आघाडी’चे सरकार उद्या सत्तेवर येईल. ठाकरे यांच्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात व जयंत पाटील हे दोन उप मुख्यमंत्री असतील. ठाकरे यांच्यासोबत हे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा शपथ घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

…अन् भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा, शिवसेनेवर डागली पुन्हा तोफ

…आता उद्धव ठाकरे असतील नवे मुख्यमंत्री, अजित पवारांनी घेतला राजकीय संन्यास

राजकीय भूकंप : अजित पवार यांनी राजीनामा दिला, प्रतिभाताई पवार यांच्यामुळे अजितदादांची माघार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी