28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयबहुमत चाचणीत महाविकास आघाडी तीन आकडी संख्येच्या आत

बहुमत चाचणीत महाविकास आघाडी तीन आकडी संख्येच्या आत

टीम लय भारी

मुंबई : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपने आपले बहुमत सिद्ध केले आहे. १६४ जणांनी शिंदे-भाजप सरकारला आपले मत दिले. तर महाविकास आघाडी तीन आकडी संख्या देखील या बहुमत चाचणीमध्ये पार करू शकली नाही. महाविकास आघाडी सरकारला फक्त ९९ मते मिळविण्यात यश मिळाले.

बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या दिवशी काँग्रेसचे तब्बल पाच आमदार अनुपस्थित होते. काल पर्यंत शिवसेनेसोबत असलेले संतोष बांगर यांनी देखील यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटात आपले मत टाकले. त्यामुळे शिवसेनेला बहुमत चाचणीवेळी आणखी एक धक्का सहन करावा लागला.

दरम्यान, यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांना विधानभवनात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने त्यांची ऐनवेळी धावपळ पण पाहायला मिळाली. पण तरी देखील काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांना बहुमत चाचणीला मुकायला लागले.

हे सुद्धा वाचा :

नवं युती सरकार पडणार की पाडणार? राज्यात भविष्यवाण्यांना आला ऊत

मनसेच्या संदीप देशपांडेंनी ठाकरे बाप-लेकाला डिवचले

‘तुमची लायकी आता फक्त बटण दाबण्यापूर्ती’, निलेश राणे यांचा शिवसेनेवर घणाघात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी