26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeटॉप न्यूजLockdown : बाळाला जन्म दिल्यानंतरही ‘ती’ 150 किलो मीटर चालत गेली

Lockdown : बाळाला जन्म दिल्यानंतरही ‘ती’ 150 किलो मीटर चालत गेली

टीम लय भारी

नाशिक : ‘लॉकडाऊन’मुळे ( Lockdown ) चालत निघालेल्या एका महिलेने रस्त्यालगत बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या दोन तासांची विश्रांती घेऊन ही महिला पुन्हा १५० किलोमीटर चालत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शकुंतला व त्यांचे पती राकेश दोघेजण नाशिकमध्ये मजुरीचे काम करायचे. कोरोना महामारीनंतर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ( Lockdown ) त्यांनी मध्य प्रदेशमधील सतना या त्यांच्या मूळ गावी जायचा निर्णय घेतला. त्यासाठी ते नाशिकवरून चालत निघाले होते.

Coronavirus

शकुंतला गरोदर होत्या. पण नाईलाजाने त्यांनाही चालत जावे लागले. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या बिजासन या गावालगत शकुंतला यांनी बाळाला जन्म दिला. ‘त्यानंतर आम्ही दोन तास विश्रांती घेतली, अन् पुन्हा १५० किलो मीटर चालत पुढे गेलो’ असे माहिती राकेश यांनी दिली.

शकुंतला व बाळाची तब्येत सध्या व्यवस्थित असल्याची माहिती मध्य प्रदेशमधील स्थानिक अधिकारी ए. के. राय यांनी दिली.

ते म्हणाले की, बाळाला जन्म दिल्यानंतर हे कुटुंबिय आणखी १५० किलो मीटर चालत ( Lockdown ) गेल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही त्यांना वाहतुकीची सोय करून त्यांच्या घरापर्यंत पाठविले. त्यांना जेवण दिले. त्यांची आरोग्य तपासणीही केली. आता त्यांना ‘होम क्वॉरन्टाईन’ केले असून त्यांची तब्येत चांगली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे ( Lockdown ) आपापल्या राज्यात परतण्यासाठी निघालेल्या मजुरांना रस्त्यांमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जेवण, पाण्याची समस्या त्यांना भेडसावत आहे. मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी रेल्वे व बसेसची सोय केली आहे. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक कुटुंबिये चालतच गावाकडे चालल्याचे चित्र दिसत आहे.

आणखी बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदींनी ‘त्या’भाषणात मजुरांबद्दल चकार शब्द नाही काढला – जावेद अख्तर

Coronaeffect : कोरोना रोखण्याची जबाबदारी “या” आठ सनदी अधिका-यांवर

Ashok Chavan : आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांनी कष्टकऱ्यांना 7500 रूपये द्यावेत

COVID-19 Lockdown: 50% of stranded migrant labourers have less than Rs 100; 97% didn’t get cash transfer from govt, finds report

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी