33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजमाहिती अधिकार कायद्याची ऐशीतैशी : पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी शुल्क आकारले, पण कागदपत्रे देण्यास...

माहिती अधिकार कायद्याची ऐशीतैशी : पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी शुल्क आकारले, पण कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

टीम लय भारी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) मुंबई प्रादेशिक विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचा पालापाचोळा केला आहे(PWD officials charged, but refused to provide the documents)

माहिती देण्यासाठी शुल्क भरून सुद्धा माहिती देण्यास अधिकारी विलंब करीत असल्याचा अत्यंत कटू अनुभव प्रस्तुत प्रतिनिधीला आला.

संतापजनक : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी RTI कायद्याचा केला पाचापाचोळा

पीडब्ल्यूडीमध्ये ‘दिवाळी’, बोगस कामे दाखवून करोडो रुपये हडपले; अधिकारी उकळताहेत ३० टक्के रक्कम

पीडब्ल्यूडीच्या वरळी येथील कार्यालयात प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. त्याअनुषंगाने माहिती अधिकाऱ्यांनी कागदपत्रांसाठी ९९२ रुपयांचे शुल्क भरण्यासंबंधी पत्र पाठविले. हे शुल्क भरण्यासाठी गुरूवार, १८ नोव्हेंबर रोजी कार्यालयात गेल्यानंतर अत्यंत संतापजनक अनुभव आला.

तेथील कर्मचाऱ्यांनी शुल्क भरून घेण्यास टाळाटाळ केली. थातूर मातूर कारणे सांगत नंतर या, अशी टोलवाटोलवी चालविली. त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने निषेध व्यक्त करणारे पत्र लिहिले. हे पत्र लिहित असतानाच अधिकाऱ्यांनी नाईलाजाने शुल्क भरून घेतले.

पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्याला ठेकेदारांकडून हवेय २० टक्के कमिशन

Indore: PWD & Metro Rail to work together to overcome challenges of flyover-cum-metro viaduct project, says Lalwani

शुल्क भरल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने सातव्या दिवशी (कार्यालयीन कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी) माहिती अधिकाऱ्यांची भेट घेतली, व कागदपत्रे मिळण्याची विनंती केली. त्यापूर्वी माहिती अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून कागदपत्रे तयार ठेवण्याची विनंती प्रस्तुत प्रतिनिधीने केली होती.

तरीही अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तयार करून ठेवली नाहीत. कळस म्हणजे, किती दिवसांत मला माहिती मिळेल, असे वारंवार विचारून सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळवतो अशा ‘सरकारी छापा’ची उत्तरे त्यांच्याकडून दिली जात होती.

कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांचीही भेट घेऊन कागदपत्रे देण्याची त्यांना विनंती केली. ‘माहिती देण्यास सांगतो’, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.

ही कागदपत्रे माहिती अधिकारात दिल्यानंतर कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार आहे. त्यामुळे माहिती देण्यास पीडब्ल्यूडीचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वरळी येथील पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत प्रचंड बोगस कामे केली आहे. गेल्या आठवड्यात सरकारकडून मोठ्या प्रमाणात पीडब्ल्यूडीच्या मुंबई प्रादेशिक विभागासाठी निधी आला आहे. यातील बहुतांश निधी हा बोगस कामांसाठी प्राप्त झालेला आहे. अधिकारी व ठेकेदार हे एकत्रितपणे बोगस कामांवरील मलिदा हडपण्याचे काम सध्या करीत आहेत.

दुसऱ्या बाजूला कोरोनामुळे सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. पण त्याची पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना कसलीही फिकीर नाही. बोगस कामे करून निधी हडपण्याचे काम अधिकारी करीत असल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी