31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमंत्रालयपीडब्ल्यूडीमध्ये ‘दिवाळी’, बोगस कामे दाखवून करोडो रुपये हडपले; अधिकारी उकळताहेत ३० टक्के...

पीडब्ल्यूडीमध्ये ‘दिवाळी’, बोगस कामे दाखवून करोडो रुपये हडपले; अधिकारी उकळताहेत ३० टक्के रक्कम

टीम लय भारी

मुंबई :  ‘कोरोना’मुळे सरकारची अवस्था भिके कंगाल झाली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) मात्र जोरात दिवाळी सुरू आहे. कामाच्या नावाखाली पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सरकारकडून भरगच्च निधी पदरात पाडून घेतला आहे. आता या निधीचे धनादेश ठेकेदारांना द्यायचे, अन् त्यांच्याकडून मजबूत कमिशन वसूल करायचा कार्यक्रम अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली (PWD: Crores of rupees seized by bogus works).

मुंबईत मंत्र्यांचे बंगले, सरकारी इमारती, सरकारी निवासस्थाने, सरकारी रूग्णालये अशा ठिकाणी अत्यावश्यक कामे करावी लागत असल्याचे दाखवून अभियंत्यांनी गलेलठ्ठ निधी पदरात पाडून घेतला आहे. पण यांत अनेक कामे बोगस आहेत. प्रत्यक्षात काम झालेले नसतानाही कागदावर कामे झाल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणात बिले काढण्यात आली आहेत.

पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्याला ठेकेदारांकडून हवेय २० टक्के कमिशन

१० लाख लाच प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलीस कोठडी, पीडब्ल्यूडीच्या दोन अधिकाऱ्यांना तूर्त दिलासा

PWD: Crores of rupees seized by bogus works 1
पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सरकारकडून भरगच्च निधी पदरात पाडून घेतला

याबाबत ठेकेदारांच्या संघटनेनेही मुख्य अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे. पीडब्ल्यूडीत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. कार्यकारी अभियंता २० ते ३० टक्के रक्कम घेऊन जुनी बोगस देयके पारित करीत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.

पीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच जागेवर

In Monday effect, Maharashtra’s Covid cases fall to April 2020 levels

जुनी देयके काढण्याचा धंदा त्वरीत बंद करावा, अशी मागणीही या संघटनेने पत्राद्वारे केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी