30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeटॉप न्यूजदिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, नेमका अजेंडा काय?

दिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, नेमका अजेंडा काय?

टीम लय भारी

नवी दिल्ली : भारतासह महाराष्ट्रही गारठतोय. उत्तरेत वारे बदललेत आणि त्यानं वातावरणही बदलून गेलंय. ह्याच बदलात दिल्लीचं राजकारण मात्र उबदार होताना दिसतंय. ह्या बदलाच्या पाठीमागे पुन्हा एकदा मराठी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची आज पुन्हा राजधानी दिल्लीत बैठक होतेय. (Opposition meet today) विशेष म्हणजे कालही याच नेत्यांमध्ये बैठक झाली होती.आजचा बैठकीचा सलग दुसरा दिवस आहे. (Sonia, Pawar and Raut again in Delhi today)

 त्यामुळे विरोधकांची मोदीविरोधी आघाडी आगामी काळात उदयाला आली तर तिची बिजं ही कालच्या आणि आजच्या बैठकीत पहायला मिळतील. कालच्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दूल्ला, द्रमूक नेते टी.आर.बालू यांची उपस्थिती होती. राहुल गांधीही बैठकीत होते. पुढच्या काही काळात यात आणखी नेते यात एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. संजय राऊत यांनी कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा भेटू, शरद पवारही असतील असं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आजची बैठक होतेय.

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट, विलासरावांचा व्हिडीओ ट्विट करत अशोक चव्हाणांचा ममतादीदींवर वार

पवार साहेबांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे सोडून बाकी जिल्ह्यातील 100 कार्यकर्ते दाखवावे

बैठकीचा अजेंडा काय?

सोनिया-पवार-राऊत भेटतायत (Sonia, Pawar, Raut Meet) म्हणजे अजेंडा राजकीय असणार यात शंका नाही. पण नेमका कोणता अजेंडा आहे याचं उत्तर संजय राऊत यांनीच दिलंय. ते म्हणाले, प्रत्येक राज्यात विरोधकांची एकजूट हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. ही पहिलीच भेट होती. उद्या (म्हणजे आज) पुन्हा भेटू, शरद पवारही असतील. अजेंड्यासंबंधात राऊतांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे. पण नेत्यांच्या प्रत्यक्ष चर्चेत काय मुद्दे होते याचीही चर्चा होतेय. तर त्यात भाजप बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करतोय. दुसऱ्या, तिसऱ्या आघाडीचा पर्याय कालबाह्य आहे. त्यात भाजपकडे मजबूत बहुमत आहे तर विरोधकांमध्ये एकीचा अभाव दिसतो. भाजपविरोधक जोपर्यंत एकवटत नाहीत तोपर्यंत बदल होणार नाही. त्यामुळेच त्या त्या राज्यात भाजपविरोधकांनी आपआपसातले मतभेद विसरुन एकत्र यावं असा विचार ह्या बैठकीत मांडण्यात आला. (Aghadi against Modi) राष्ट्रीय पातळीवर भाजपला एकच सक्षम पर्याय उभा करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्याच्याच पुढची चर्चा आज होतेय.

ममता आणि इतरांचं काय?

मोदीविरोधी आघाडी उभी करताना विरोधकांमध्ये एकीचा अभाव दिसतो हे पुन्हा पुन्हा दिसून आलं आहे. त्यात टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी अलिकडेच मुंबईचा दौरा केला. ह्या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठक केली. राऊत, आदित्य ठाकरेंनाही त्या बोलल्या. त्यांनी जे दोन -तीन सार्वजनिक कार्यक्रम केले, त्यात राहुल गांधींच्या किंवा काँग्रेस नेतृत्वावर टीका करण्याची संधी सोडली नाही. सहा महिने तुम्ही विदेशात राहणार तर मग राजकारण कसं करणार असं वक्तव्य करत त्यांनी राहुल गांधींवर प्रश्नचिन्हं निर्माण केलं होतं. यूपीए आहेच कुठं हे पवारांच्या समक्ष पत्रकारांसमोर बोलायला ममता मागे राहिल्या नाहीत. त्यामुळेच फक्त ममताच नाही तर अखिलेश यादव, मायावती, दक्षिण, ईशान्यतील राज्य इथल्या नेत्यांनाही एकत्र करणे वाटतं तेवढं सोप्पं नाही. त्यामुळेच कालच्या आणि आजच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं दिसतंय.

संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

Shiv Sena, NCP eager to join hands for PCMC polls, Congress likely to go solo

शिवसेनेचं सारथ्य

शिवसेनेनं विशेषत: संजय राऊत यांनी आधी राज्यात भाजपपासून फारकत घेत आघाडी सरकार बनवण्यात जी भूमिका घेतली आणि आता ते देशपातळीवर जी भूमिका मांडतायत, त्यानं भाजप नेत्यांना डोकेदुखी वाटत असणार. शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर बरं झालं असाही विचार येत असेल.  कारण शिवसेनेनं भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं आणि स्वत: कडे पाच वर्षे मुख्यमंत्रीपद घेतलं. हाच प्रयोग पवार आणि राऊत काँग्रेसला सोबत घेऊन देशपातळीवर राबवण्याच्या विचारात असल्याचं जाणकारांना वाटतं. त्यासाठी संजय राऊत दिल्लीत इतक्या सहजपणे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटतायत की एवढं तर काँग्रेस नेत्यांनाही शक्य नाही अशी प्रतिक्रिया दिल्लीत आहेत. बरं राऊत फक्त काँग्रेस हायकमांडलाच भेटतायत असं नाही तर इतर काँग्रेस नेत्यांमध्येही सहज मिसळताना दिसतायत.
विचार काय असेल?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी