31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयभाजप नेते नरेंद्र मोदींना शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजतात : अतुल लोंढे

भाजप नेते नरेंद्र मोदींना शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजतात : अतुल लोंढे

टीम लय भारी

मुंबई : १९ फेब्रुवारी देशभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजपवर टीका केली. राज्यातल्या भाजप नेत्यांना महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात, असे विधान त्यांनी केले. ज्यात पियुष गोयल छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख यावरूनच त्यांनी संताप व्यक्त करत टीका केली आहे(Atul Londhe criticized BJP for insulting Maharashtra).

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अतुल लोंढे पाटील यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “आपण आचार्य विद्यासागर महाराज म्हणालात योग्य आहे. आपण मोदीजी म्हणालात योग्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांना, एकेरीत “शिवाजी” का? असा उपमर्द/अपमान करण्याची हिम्मत कशी होते?”, असा सवाल अतुल लोंढे पाटील यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री आणि खासदार बाकं वाजवत होते. शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या या अपमानाबद्दल महाराष्ट्राची जनता भाजपाला कदापी माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या घोर अपमान केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेची पंतप्रधान मोदींनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस आंदोलन करत असल्याचे लोंढे पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसने निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा

राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे : नाना पटोले

किरिट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल! : अतुल लोंढे

On KCR’s Third Front Efforts, Congress: No Alliance Possible Without Us

या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपा आंदोलन करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पुतळे, फोटो जाळून भाजपा त्यांची नथुराम प्रवृत्ती दाखवत आहे. राज्यातील भाजपा नेत्यांनी मोदींना महाराष्ट्राच्या अपमानाची जाणीव करुन देत माफी मागायला सांगितली असती आणि पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध केला असता तर बरे झाले असते. परंतु भाजपासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मतांसाठी आहेत असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी