25 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeटॉप न्यूजनिफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळले

निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळले

एकीकडे राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल जाहीर होत लोकसभा निवडणुकांच्या निकालाची चर्चा पाहायला मिळत आहे. मतमोजणी सुरू असून काही ठिकाणी विजेत्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. याच दरम्यान नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील निफाड तालुक्यात (Nipahd Taluka) शिरसगाव येथे सुखोई विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.नाशिकमध्ये लढाऊ विमान कोसळलं आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात झाला असून हे विमान नाशिक जिल्ह्यात कोसळले आहे.

एकीकडे राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल जाहीर होत लोकसभा निवडणुकांच्या निकालाची चर्चा पाहायला मिळत आहे. मतमोजणी सुरू असून काही ठिकाणी विजेत्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. याच दरम्यान नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील निफाड तालुक्यात (Nipahd Taluka) शिरसगाव येथे सुखोई विमान कोसळल्याची दुर्घटना (plane crashes) घडली आहे.नाशिकमध्ये लढाऊ विमान कोसळलं आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात झाला (plane crashes) असून हे विमान नाशिक जिल्ह्यात कोसळले आहे.(Sukhoi plane crashes in Niphad taluka)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील शिरसगाव, कोकणगाव शिवारात हे विमान कोसळले (Plane Crashed) आहे. या दुर्घटनेत दोन पायलट जखमी झाले असून दोन्ही वैमानिक थोडक्यात बचावले आहेत. तर ज्या शेतकऱ्याच्या शेतात हे विमान कोसळले त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

भारतीय हवाई दलाचे एक A Su-30 MKI हे लढाऊ विमान आज महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कोसळले आहे. हे विमान ओव्हरहॉलिंगसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे होते. विमान कोसळले तेव्हा त्यात दोन पायलट होते, या दोन्ही पायलटना बाहेर काढण्यात यश आलं आहे. ते दोघेही सुरक्षित आहेत. या प्रकरणी अधिक तपशीलांची प्रतीक्षा करत आहोत, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये पिंपळगावातील शिरसगाव परिसरातील शेतामध्ये हे हवाई दलाचे विमान दुपारी कोसळले. विमान कोसळले, त्यावेळी शेतात कोणीच काम करत नव्हतं. दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने वेळीच विमानातून बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच वायूदलाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही पायलट वेळीच विमानातून बाहेर पडल्याने बचावले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते कोसळल्याची चर्चा होत आहे. मात्र विमान कोसळल्याच्या कारणाबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, शिरसगाव येथे लढावू विमान कोसळल्याची माहिती मिळताच निफाडचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी तत्काळ घटनास्थळी भेट जाऊन पाहणी केली. तसेच वैमानिकांची विचारपूस केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी