26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeटॉप न्यूजED Scam : मुंबईतील ‘ईडी’ अधिका-यांचा गोरखधंदा, सूरत पोलिसांकडून पर्दाफाश; जप्त केलेले...

ED Scam : मुंबईतील ‘ईडी’ अधिका-यांचा गोरखधंदा, सूरत पोलिसांकडून पर्दाफाश; जप्त केलेले कंटेनर २ लाखांत विकले, तिघांना अटक

टीम लय भारी

सूरत : अंमलबजावणी संचालनालया (ईडी) च्या अधिका-यांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश (ED Scam) सूरत पोलिसांनी केला आहे. (Surat police exposes ‘ED’ scam in Mumbai) मुंबईतील ईडीच्या अधिका-यांवर जप्त करण्यात आलेल्या गाड्या विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सूरत ग्रामीण पोलिसांनी आयआरएस अधिकारी प्रवीण साळुंखेंसह आणखी एकाला आरोपी केले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचीच विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, यात ईडीच्या अधिका-यांचा हात असल्याचे समोर आले आहे. सूरत ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मुंबईत कर्तव्यावर असेल्या दोन ईडीच्या अधिका-यांचा समावेश आहे. २०१० बॅचचे आयआरएस अधिकारी प्रवीण साळुंखे आणि इन्सपेक्टर भेराराम या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

सूरतचे सहपोलीस आयुक्त भार्गव पंड्या यांनी सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी ईडी आणि सीबीआयने जप्त केलेले ट्रक आणि कंटेनर हे भिंत तोडून बाहेर नेले होते. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संतोष नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने या प्रकरणात ईडीच्या अधिका-यांचा हात असल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला. संतोषचा मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप चॅट तपासण्यात आले. यात त्याने प्रवीण साळुंखे यांच्याशी संवाद साधल्याचे समोर आले. जप्त केलेली वाहने ही बाजारात २ लाख रुपयांमध्ये विकण्यात आली होती. यात संतोषला २० ते ३० हजार रक्कम प्रती कंटेनर भेटत होती. उरलेली रक्कम ही ईडीचे अधिकारी खिश्यात घालत होते.’

२०१८ मध्ये बँक ऑफ इंडियाच्या रिकव्हरी मॅनेजरने सूरतमधील सिद्धी विनायक लॉजिस्टिकविरोधात तक्रार दाखल केली होती. सिद्धी विनायक लॉजिस्टिकने १२५ कोटींचे कर्ज घेतले होते. पण, कर्जाची परतफेड केली नव्हती. त्यामुळे २०६ ट्रक आणि कंटेनर सीबीआय आणि ईडीने जप्त केले होते. पण, ईडीच्या अधिका-यांनी कंटेनरचे नंबर प्लेट बदलले आणि बाजारात विकून टाकले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी