30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूजबार सुरू झाले, देव कुलुपबंद का? राज्यपाल कोश्यारींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

बार सुरू झाले, देव कुलुपबंद का? राज्यपाल कोश्यारींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील मंदिर खुली करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर पकडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ‘घंटानाद’ करणा-या भाजपाने मंदिर खुली करण्यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा आंदोलन केले. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिर खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

लॉकडाऊन शिथिल केला जात असतानाच राज्यात मंदिरे खुली करण्याची मागणी जोर धरायला लागली होती. मंदिरे खुली करण्यासंदर्भात भाजपा, वंचित बहुजन आघाडीसह इतर संघटनांनीही आंदोलने केली. मात्र, कोरोना वाढीचा धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी तूर्तास मंदिर खुली होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपा आक्रमक झाल्याचे दिसून आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मंदिर खुली करण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. यात राज्यपालांनी एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत, तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाऊनमध्येच ठेवले आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही कोरोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी