25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
Homeटॉप न्यूजकाँग्रेस पक्षामध्ये दोन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा प्रवेश!

काँग्रेस पक्षामध्ये दोन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा प्रवेश!

टीम लय भारी

औरंगाबाद : औरंगाबादच्या दोन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या निवासस्थानी पक्षसोहळा पार पडला. यावेळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रफिक शेख, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख इब्राहिम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी हिशाम उस्मानी यांनी त्यांचे स्वागत केले. हा प्रवेश सोहळा रविवारी पार पडला.

दोन्ही निवृत्त पोलीस अधिकारी रफिक शेख, इब्राहिम शेख यांच्यासोबत विविध वार्डातील राहणारे प्रतिष्ठित व्यक्ती, युवकांनी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यामध्ये शेख मोबीन, शाहिद शेख, शेख शफीक, शेख जावेद यांच्यासह शेकडो तरुणांनी अधिकृतपणे प्रवेश घेतला. काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागावे व सामान्य जनतेचे विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सामान्य लोकांचे प्रश्न सोडवावे व पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करावे असे शहर जिल्हा अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी बैठकीत सांगितले.

सर्वांनी पक्षाच्या माध्यमाने जास्तीत जास्त सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मेहनत घेण्याचे वचन दिले व व याप्रसंगी आगामी निवडणुकीत विविध वार्डात पक्षबांधणीसाठी जास्तीत जास्त परिश्रम घेण्याचे सुद्धा वचन दिले. या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त काँग्रेस नेते संजय वाघमारे , मोईन शेख हर्सूलकर अमजद खान इत्यादी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी