30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeएज्युकेशनUPSC Exam 2020 : यूपीएससी परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

UPSC Exam 2020 : यूपीएससी परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

टीम लय भारी

मुंबई : कोरोना विषाणुच्या प्रसाराच्या धोक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा (UPSC Exam 2020) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

आयोगाकडून घेण्यात येणा-या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.

UPSC Exam अशा असणार परीक्षा

  • ६ सप्टेंबर २०२० – एनडीए आणि एन परीक्षा (१) २०२०
  • ४ ऑक्टोबर २०२० – सिविल सेवा (IAS) आणि भारतीय वन सेवा (IFS) प्राथमिक परीक्षा २०२०
  • १६ ऑक्टोबर – भारतीय आर्थिक सेवा (IES) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा
  • ८ ऑगस्ट – जियो सायंटिस्ट (मुख्य) परीक्षा २०२०
  • ९ ऑगस्ट – इंजिनिअरिंग सेवा
  • २२ ऑक्टोबर – संयुक्त चिकित्सा सेवा (CMS) परीक्षा २०२०
  • २० डिसेंबर – सेंट्रल आर्म्ड पुलिस बल (असिस्टेंट कमांडेंट)परीक्षा २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्वच काम ठप्प झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणा-या विविध परीक्षांवरही यांचा परिणाम झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेले UPSC Exam वेळापत्रक

UPSC Exam 2020 : यूपीएससी परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

कोरोनाचा परिणाम इतर परीक्षांवरही झाला आहे. ऐन परीक्षांच्या काळातच कोरोनाचा भारतात शिरकाव झाला. त्यामुळे अंतिम परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारने लॉकडाउन शिथिल करत सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी