35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeएज्युकेशनभाऊ आयपीएस, बहिणीने रंगवलेल्या शाळेसमोर केला सन्मान

भाऊ आयपीएस, बहिणीने रंगवलेल्या शाळेसमोर केला सन्मान

टीम लय भारी

जावली : तालुक्यातील सनपाने गावचे सुपुत्र ओमकार मधुकर पवार यांनी संपूर्ण देशात यु.पी.एस.सी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. (Upsc result declared, omkar pawar the first IPS from jawli)

तसेच त्याला ४५५ वी रॅंक मिळाली आहे. जावळी तालुक्यातील पहिले आय.पी.एस. अधिकारी म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे.

एकनाथ शिंदेंनी मानले मंत्री जयंत पाटील यांचे तब्बल १७ वर्षांनंतर आभार

‘कोटा फॅक्टरी’ सिरीजचा सीझन २ झाला प्रदर्शित, जाणून घ्या कसा आहे सीझन २

त्यांचा सत्कार जवळवाडीकरांच्या वतीने घेण्यात आला. यावेळी सरपंच वर्षा विलास जवळ यांनी अभिमानाने सांगितले आपली बहिण तेजस्वी पवार यांनी दोन वर्षापूर्वी येथिल शाळा व ग्रामपंचायतीच्या भिंती रंगविल्या होत्या. बोलक्या केल्या होत्या. त्यांच्या समोरच भावाच्या कर्तुत्वाचा गौरव म्हणजे जवळवाडीकरांसाठी सुवर्णयोग असल्याचे गौरव उदगार वर्षा जवळ यांनी काढले.

सनपाने येथिल फोटोग्राफर व सामान्य शेतकरी कुटुंबातील मधुकर पवार यांचे चिरंजीव ओमकार पवार यांनी यु.पी.एस.सी परिक्षेत घवघवीत यश मिळवित जावली तालुक्यातील पहिला आय.पी.एस.अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्या यशाबद्दल जवळवाडीकरांच्या वतीने त्यांचा सत्कार जवळवाडी येथे आयोजीत केला होता.

यावेळी त्यांचे पिताश्री मधुकर पवार, काका श्री संजय पवार, तानाजी पवार, आण्णासाहेब धनावडे, भाऊशेठ जवळ, आर्मी ऑफिसर वैभव जवळ, यशवंत चव्हाण, बाबुराव जवळ, जोतिराम जवळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना ओमकार पवार म्हणाले मी जि.प. शाळेतच शिकलो असून अभ्यास सुध्दा घरीच केला आहे. पण घरच्यांनी दिलेले बळ व त्यांनी घेतलेले परिश्रम कायम नजरे समोर ठेवले की यश मिळणे कठीण नसते.

UPSC Exam 2020 : यूपीएससी परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

Upsc
Ips ओमकार पवार

माजी IPS अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची केली कानउघडणी

आपण सर्व युवकांनी ध्येय निश्चित करा मी पहिला आय.पी.एस असलो तरी ही सुरवात आहे आपण सर्वांनी जिद्दीने व ध्येयाने अभ्यास करा जावळी तालुक्याला अधिकार्‍यांची जावळी म्हणून नवी ओळख निर्माण करूया. माझ्या बहीणीने रंगवलेल्या शाळेसमोर माझा सत्कार होणे मी माझे भाग्यच समजतो. ती तिच्या क्षेत्रात नावलौकीक वाढविते आहे याचा निश्चितच अभिमान आहे. असेही ओंकार पुढे म्हणाला.

या प्रसंगी जवळवाडीतील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी