35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनफिल्मसिटीमध्ये जादूई नगरी, सामान्य लोकांनाही पाहण्याची सुवर्णसंधी !

फिल्मसिटीमध्ये जादूई नगरी, सामान्य लोकांनाही पाहण्याची सुवर्णसंधी !

फिल्मसिटीमध्ये संतोष मिरगर यांनी भले मोठे बॉलिवूड पार्क उभारले आहे. या बॉलिवूड पार्कमध्ये गेल्यानंतर सिताऱ्यांच्या जादूई नगरीत माृणूस रमून जातो. हे पाहू का, ते पाहू अशी त्याची स्थिती होवून जाते. या बॉलिवूड पार्कमधील सूत्रसंचालिका दिव्या राठोड यांनी पार्कमधील माहिती 'लय भारी'च्या वाचक व प्रेक्षकांना खुमासदार शैलीत दिली आहे. त्यातील काहीसा भाग पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध करीत आहोत.

फिल्मसिटीचा म्हणजेच दादासाहेब फाळके चित्रनगरीचा जगभरात मोठा नावलौकीक आहे. अख्ख्या बॉलीवूडबद्दल जगभरात कुतूहल व्यक्त केले जाते. भारतभरातील (व पाकिस्तानातीलही) जनतेमध्ये फिल्मसिटीविषयी कमालीचे आकर्षण आहे. या आकर्षणापोटी देशभरातून अनेकजण फिल्मसिटी पाहण्यासाठी मुंबईत येत असतात. पण बहुतांशजणांना प्रवेशद्वारावरूनच परत जावे लागते. उचित कारणाशिवाय सुरक्षा रक्षक आतमध्ये जावू देत नाहीत. बरीच धडपड केल्यानंतरही फिल्मसिटी पाहण्याचे स्वप्न अधुरे राहते. पण अलिकडे फिल्मसिटी पाहण्यासाठी आता सामान्य लोकांनाही सोडले जाते. ऑनलाईन नोंदणी करून व त्याबाबतचे शुल्क भरल्यानंतर फिल्मसिटी पाहायला मिळते. फिल्मसिटीमध्ये पर्यटकांना तब्बल ६०० एकरची सफर घडवून आणली जाते. चित्रपट व मालिका कशी बनविली जाते हे या ठिकाणी पाहायला मिळते.

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते संतोष मिरगर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाबाबतच्या व्हिडीओंची, बातम्यांची व लेखांची मालिका ‘लय भारी’च्या वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. या मालिकेच्या अनुषंगाने अनुषंगाने पहिला व्हिडीओ आम्ही आज प्रसिद्ध केला आहे.

संतोष मिरगर यांनी फिल्मसिटीमध्ये भले मोठे बॉलिवूड पार्क उभारले आहे. या बॉलिवूड पार्कमध्ये गेल्यानंतर सिताऱ्यांच्या जादूई नगरीत रमून जातो. हे पाहू का, ते पाहू अशी त्याची स्थिती होवून जाते. या बॉलिवूड पार्कमधील सूत्रसंचालिका दिव्या राठोड यांनी पार्कमधील माहिती ‘लय भारी’च्या वाचक व प्रेक्षकांना खुमासदार शैलीत दिली आहे. त्यातील काहीसा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी