28 C
Mumbai
Sunday, June 30, 2024
Homeव्हिडीओविखेंच्या संस्थेतील उच्च शिक्षीत तरूणी म्हणते, डॉ. सुजय कुचकामी !

विखेंच्या संस्थेतील उच्च शिक्षीत तरूणी म्हणते, डॉ. सुजय कुचकामी !

लय भारीचा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी तेथील गाव पातळीवर काय वातावरण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ मध्ये तुषार खरात यांनी प्रवरा येथील उच्चशिक्षित तरूणीशी संवाद साधुन तरूणांचं या एकुण राजकीय परिस्थितीवर काय मत आहे हे जाणून घेतले आहे.

लय भारीचा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे(Information about Vikhe Patil). यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी तेथील गाव पातळीवर काय वातावरण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ मध्ये तुषार खरात यांनी प्रवरा येथील उच्चशिक्षित तरूणीशी संवाद साधुन तरूणांचं या एकुण राजकीय परिस्थितीवर काय मत आहे हे जाणून घेतले आहे. राजश्री काळे ही तरूणी मेकॅनिकल इंजिनिअर असून, तिने तिचे अभियांत्रिकीचे शिक्षण विखे-पाटलांच्या प्रवरा येथील महाविद्यालयात पुर्ण केले आहे.

विखे-पाटलांच्या एकुण कार्याविषयी बोलताना राजश्री यांनी ‘रूपयाचा कडिपत्ता नि आमचा खासदार बेपत्ता’, असा त्यांचा उल्लेख केला आहे. ते कधीच महाविद्यालयात फिरकत नाही कि कुठल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत नाहीत. याउलट निलेश लंके हे सतत जनसामान्यांमध्ये आमच्यासाठी उपलब्ध असतात. कोरोनामध्ये लंकेंनी लोकांसाठी केलेले काम असेल, पाथर्डी रस्त्यावर होणा-या अपघाताला आळा बसावा म्हणून त्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांनी केलेले उपोषण असेल, एमपीएससी तसेच युपीएससी च्या विद्यार्थयांसाठी स्पर्धा परिक्षा अभ्यासिका उभारण्याचं कामं ही निलेश लंके यांनी केलेले आहे. त्यामुळे भाजपच्या धार्मिक राजकारणाला बळी न पडता आजचा तरूण हा जागृकपणे योग्य उमेद्वारालाच निवडणार असे मत लय भारीशी बोलताना राजश्री यांनी मांडले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी