28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeव्हिडीओVIDEO : भाजप नेत्याचा बेशरमपणा, पोलिसांना आईच्या नावाने शिवीगाळ

VIDEO : भाजप नेत्याचा बेशरमपणा, पोलिसांना आईच्या नावाने शिवीगाळ

लय भारी न्यूज नेटवर्क

जिंतूर : ‘तुमच्या मायची xxx टाकेन पोलिसांची’, हे शब्द कोणत्या गल्लीतल्या थातूरमातूर व्यक्तीचे नाहीत. तब्बल पाच वेळा आमदार राहिलेल्या एका नेत्याचे आहेत. निवडणुकीच्या प्रचारसभेत व्यासपीठावरून पोलिसांना जाहीररित्या शिवीगाळ करणारे हे महाशय भाजपचे नेते आहेत.

‘पोलिसांनो माझ्या गाड्या तिकडे आहेत, त्या गाड्यांना हात लावला तर तुमच्या मायची झxx टाकेन पोलिसांची’ असे वक्तव्य या महाशयांनी केले. रामप्रसाद बोर्डीकर असे या नेत्याचे नाव आहे. त्यांची कन्या मेघना बोर्डीकर भाजपच्या उमेदवार आहेत. जिंतूर विधानसभा निवडणुकीतून त्या लढत देत आहेत. एका कार्यक्रमात आयोजित केलेल्या सभेतून त्यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी पोलिसांचा अर्वाच्य भाषेत गौरव केला आहे. धक्कादायक म्हणजे, बोर्डीकर यांनी आईचा उद्धार करीत शिवीगाळ केल्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी हात वर करून टाळ्या वाजवत वडीलांना दाद दिली आहे. पिता पुत्रांनी पोलिसांचा ‘गौरव’ केल्यानंतर जमलेल्या लोकांनीही वडील व लेकीचे टाळ्या व शिट्या वाजवून कौतुक केले आहे.

बोर्डीकर यांच्या या ‘गौरवास्पद’ वक्तव्याचा व्हिडीओ आता सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यांचे हे शब्द ऐकून लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहेत. बोर्डीकर यांचा हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा असला तरी तो आता त्यांच्या विरोधातच जोरात व्हायरल केला जात आहे.

कोण आहेत रामप्रसाद बोर्डीकर ?

रामप्रसाद बोर्डीकर तब्बल चार वेळा विधानसभेचे, तर एक वेळा विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. परंतु आमदार म्हणून त्यांची ही कारकिर्द काँग्रेस पक्षातील आहे. त्यांना काँग्रेसने भरभरून दिले. पण सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यावेळी जिंतूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांनी रामप्रसाद बोर्डीकर यांचा दणदणीत मतांनी पराभव केला. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही बोर्डीकर यांना सतत अपयश येत गेले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना आपली कन्या मेघना यांच्यासाठी लोकसभेची तिकिट हवे होते. परंतु त्यांना तिकिट मिळाले नाही. त्यामुळे मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली केल्या होत्या. मात्र जिंतूर मतदारसंघातून त्यांना यावेळी भाजपने तिकिट दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी