27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeव्हिडीओउज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड; गायकवाड यांचा जाहीरनामा, निकम यांच्या नैतिकवर प्रश्नचिन्ह...

उज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड; गायकवाड यांचा जाहीरनामा, निकम यांच्या नैतिकवर प्रश्नचिन्ह !

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड, तर भाजपकडून उज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. निकम हे विधी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आहेत, तर गायकवाड या शिक्षण व राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आहेत.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड, तर भाजपकडून उज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत(Varsha Gaikwad against Ujwal Nikam). निकम हे विधी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आहेत, तर गायकवाड या शिक्षण व राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आहेत. वर्षा गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास कसा करणार, याबद्दल जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. पत्रकार परिषदेत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी उज्जल निकम हे आयात उमेदवार आहे. उज्वल निकम नैतिकच्या कसोटीवर टिकू शकत नाहीत. २६ / ११ दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचे प्रकरण त्यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळले. त्यांनी सरकारकडून महागड्या व अलिशान सुविधा घेतल्या. अशा पद्धतीचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

वर्षा गायकवाड व उज्वल निकम यांच्यातील लढत रंगतदार होणार आहे. गेली १० वर्षे या ठिकाणी पुनम महाजन या खासदार होत्या. भाजपचे मातब्बर नेते कै. प्रमोद महाजन यांच्या त्या कन्या आहेत. परंतु यावेळी त्यांचे तिकीट नाकारले गेले आहे. त्यामुळे महाजन यांचे चाहते व मराठी वर्गामध्ये भाजपविषयी नाराजी आहे. मुळातच या मतदारसंघात सुनील दत्त व त्यांची कन्या प्रिया दत्त यांनी बराच काळ प्रतिनिधीत्व केले आहे. उज्वल निकम यांना संघटना चालविण्याचा काहीही अनुभव नाही. याउलट वर्षा गायकवाड यांना तळागाळात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे उज्वल निकम यांच्यापेक्षा वर्षा गायकवाड यांनी प्रचारात सरशी मारल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी