30 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रBJP : विकास लवटे यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदी निवड

BJP : विकास लवटे यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदी निवड

टीम लय भारी

पुणे : भाजपाचे (BJP) 25 वर्षाहून अधिक काळ निष्ठने काम करणारे विकास लवटे यांची शहराचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रवक्तेपदी निवड केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्वाची मानली जाते.

पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता असून ती टिकवायची असेल तर केलेली चांगली कामे नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजेत. त्याच अपेक्षेने शहराध्यक्ष मुळीक यांनी ही जबाबदारी दिल्याचे बोलले जाते. विकास लवटे एक चांगला वक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत.

विकास लवटे यांनी यापूर्वी भाजपात वेगवेगळ्या पदांवर काम केले असून भटक्या विमुक्त आघाडीचे ते यापूर्वी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते.

बिबवेवाडी विकास प्रतिष्ठान या माध्यमातूनही त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक सामाजिक कार्य केली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी