31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयवुमन्स विंगतर्फे बांधकाम कामगारांना कामगार नोंदणी कार्डचे वितरण

वुमन्स विंगतर्फे बांधकाम कामगारांना कामगार नोंदणी कार्डचे वितरण

टीम लय भारी 

मुंबई : क्रेडाई-एमसीएचआय वुमन्स विंग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 36 बांधकाम कामगारांना कामगार नोंदणी कार्डचे (Worker registration cards) वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम अजमेरा लँड, भक्ती पार्क, वडाळा  येथे पार पडला. वुमन्स विंगतर्फे अशाप्रकारे पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात येत आहे. (Worker registration cards to construction workers  by Women’s Wing ) .

“मुंबई आणि एमएमआर विभागामध्ये हजारो गृहनिर्माण सुरू आहेत ज्यामध्ये दोन ते अडीच लाख कामगार काम करत आहेत. पण कामगारांच्या नोंदणीचा आकडा अवघा तीस हजार आहे. त्यामुळे विकासक आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी या कामगार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा” असे आवाहन  एस. सी. श्रीरंगम यांनी केले. यावेळी त्यांनी अनेक नव्या योजनांबद्दल सांगितले. तसेच एमसीएचआयच्या वुमन्स विंगने अशाप्रकारे पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

“विकासक कामगारांसाठी सरकारला १% अधिभार देतात. आणि त्याचा उपयोग आमच्याच कामगारांसाठी केला जातो. त्यांच्यासाठी सरकारकडून मिळाणा-या सुविधा खरंच अविश्वसनीय आहे. त्यामुळे कामगारांनी त्याचा लाभ घ्यावा” असे आवाहन  बोमन इरानी, अध्यक्ष, क्रेडाई-एमसीएचआय यांनी यावेळी कामगारांना केले. तसेच श्रीरंगम यांना आश्वासन देत ते म्हणाले “आम्ही असे आणखी कार्यक्रम करू आणि याबद्दलची जागृकता कामगारांध्ये निर्माण करू. आणि या योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहीत करू.”

“महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या बरोबर आम्ही काम करत आहोत हे जाहीर करतांना आम्हाला आनंद होत आहे. क्रेडाई-एमसीएचआयच्या १३०० हून अधिक सदस्यांच्या बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्ड बनवण्याची आणि त्यांच्यासाठी उपयोगी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वुमन्स विंग कटीबद्ध आहे.” असा विश्वास क्रेडाई-एमसीएचआयच्या चेअरपर्सन  मोना अजमेरांनी दिला.

यावेळी निलांबरी भोसले यांनी कामगारांसाठी मार्गदर्शन केले. सरकारतर्फे राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती देण्यात आली. बांधकाम कामगारांसाठी सरकार तर्फे विविध योजना राबविण्यात येतात. मग त्यांची सुरक्षा असो, त्यांच्या कुटुंबांसाठी आरोग्य सेवा, आर्थिक मदत असो अथवा त्यांच्या मुलाबाळांसाठी शिक्षणासंदर्भातील मदत असो. सरकार यांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे पण बांधकाम कामगार हा सर्वात मोठा असंघटित विभाग आहे. त्यामुळे या सेवा त्यांच्यापर्यंत पोहचतच नाहीत. कामगारांना या सेवांचा लाभ मिळावा म्हणून बांधकाम व्यावसायिक यासाठी १ टक्का अधिभार देतात.(Worker registration cards to construction workers  by Women’s Wing)

पण तरीही या सेवा घेण्यासाठी कामगार उदासिन दिसत आहेत.क्रेडाई-एमसीएचआय वुमन्स विंग सीएसआरच्या माध्यमातून विविध कार्य करत असते. महिला शाखेने आतापर्यंत 186 पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली असून या उदात्त उपक्रमावर 67 लाखांहून अधिक रुपये खर्च केले आहेत. विंग MMR मधील विविध प्रकल्पांमध्ये बांधकाम मजुरांसाठी विविध आरोग्य शिबिरे देखील चालवते आणि आतापर्यंत अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हजारोच्या घरात मजुरांना फायदा झाला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी  एस. सी. श्रीरंगम उपस्थित होते. तर सन्माननीय अतिथी म्हणून  निलांबरी भोसले, कामगार उपायुक्त,  राजश्री पाटील, सहा. कामगार आयुक्त (शहर),  बोमन इराणी, अध्यक्ष, क्रेडाई-एमसीएचआय,  अजय आशर, अध्यक्ष निर्वाचित, क्रेडाई-एमसीएचआय, तथा वुमन्स विंगच्या चेअरपर्सन श्रीमती मोना अजमेरा, जेसल शहा, सचिव, अलका दोशी, कोषाध्यक्ष, अनुराधा शहा, सोनल शहा, सेजल गोराडिया उपस्थित होत्या .


हे सुद्धा वाचा : 

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची ED चौकशी होणार का?

Jaykumar Gore : तहसिलदाराच्या निलंबनासाठी आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचाही भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा !

Focused approach to registration of migrant workers stressed

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी