28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्र'लॉकडाऊन'मध्ये दारू विक्रीचा परिणाम, वेटरकडून तरूणाची हत्या !

‘लॉकडाऊन’मध्ये दारू विक्रीचा परिणाम, वेटरकडून तरूणाची हत्या !

लय भारी टीम

सातारा : लॉकडाउनच्या काळातच सरकारने महसूल मिळवण्यासाठी दारु विक्रेत्यांना परवानगी दिली. मात्र साता-यात दारूच्या नशेत एका तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून आरोपीला अटक करुन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

सातारा जिल्ह्यातील बुधवारी  दारू दुकाने उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले होते. परंतु त्याचा दुष्परिणाम वेगळाच दिसून आला. मध्यपी व इतरांची दारू दुकानात झुबंड उडाली होती. सातारा – कोल्हापूर महामार्गावर असलेल्या वाढे तालुका सातारा येथील वाढे फाट्यावरील साई ढाबा येथे वेटरचे काम पहाणारे तिघाजणांनी रांगेत उभे राहून दारू दुकानातून दारू विकत घेतली. शेजारील रानातील झाडाखाली पार्टी केली. दारू चांगलीच चढल्यानंतर वेटर दीपक विश्वनाथ दय्या (वय -२९) वाढे फाटा मुळगाव शिवाजी वाडी, भारत नगर, नाशिक याने सायकल लपविण्याच्या कारणातून वाद केला.  त्यानंतर स्थानिक तरुण सुरज निगडे (वय -३५ ) राहणार वाढे. याच्या डोक्यात भला मोठा दगड घालून खून केला. सदरची घटना सायंकाळी चार वाजता घडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सातारा तालूका पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय हंकारे, पोलीस कर्मचारी दादा परिहार सुजीत भोसले यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.

मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी सातारा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, सातारा राष्ट्रीय महामार्गानजिक असलेल्या वाढे फाटा येथे काही हॉटेल व ढाब्यावर जेवणाबरोबरच दारूची सोय करतात. मग हे तिघे दारू पिण्यास रानात का गेले ?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी