29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeराजकीयभाजपने आम्हाला शिकविण्यापेक्षा स्वतःच आत्मपरिक्षण करावे : शिवसेनेचा टोला

भाजपने आम्हाला शिकविण्यापेक्षा स्वतःच आत्मपरिक्षण करावे : शिवसेनेचा टोला

टीम लय भारी / वेब स्काय मीडिया

मुंबई : महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये छप्पर फाडके यश मिळविले. भाजपचाही धुव्वा उडवला. त्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला ( Anil Parab scathing to BJP ).

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अनिल परब म्हणाले, विधान परिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले आहे. अमरावतीची जागा आम्ही हरलो. पण, ही जागा आमची नव्हतीच. अमरावतीची जागा ही नेहमी अपक्ष जिंकत आले आहेत. आम्हाला अक्कल शिकविण्यापेक्षा भाजपनेच आत्मचिंतन करावे .

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपला जोरदार धक्का देऊन घवघवीत यश मिळवले आहे. दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे.

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिली. यामुळे या निकालात काहीही धक्कादायक असे घडलेले नाही. हे होणारच होते. परंतु तरीही भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज देत चांगली लढत दिली आहे. मुळात मुद्दा असा की, शिवसेनेला काय मिळालं? याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली, अशी सारवासारव आता भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे.

भाजपला निदान धुळे – नंदुरबार मतदारसंघामध्ये केवळ विजय मिळविता आला. शिवसेनेचे काय ? शिवसेनेने अमरावतीची एकमेव जगादेखील गमावलीय. पण, या निवडणुकीमध्ये सर्वाधिक फायदा झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्यांनी पुणे, औरंगाबाद व अप्रत्यक्षरीत्या अमरावती शिक्षक मतदारसंघात विजय प्राप्त केला आहे. माझे या तिघांना पण थेट आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने आमचा सामना करावा. मात्र, त्या तीन पक्षांत हिंमत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पाटील यांच्या या सल्ल्यावर अजित पवार यांनी प्रतीटोला लगावला आहे. आम्ही आघाडी करून लढायचे की, एकट्याने याचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिनकामाचा सल्ला देण्याची काहीही गरज नाही.

हे सुद्धा वाचा

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

corona vaccine: भारताने तब्बल १६० कोटी लशींचे बुकिंग करून जगात मारली बाजी

Crime : एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह; कांदिवली परिसरात खळबळ

सर्वच मतदारसंघामध्ये आघाडीतील पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केले. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक आघाडीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल तर तसे अजिबात होता कामा नये, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली, तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी