31 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदींच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की : बाळासाहेब थोरातांचे टीकास्त्र

नरेंद्र मोदींच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की : बाळासाहेब थोरातांचे टीकास्त्र

टीम लय भारी

मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठींबा मिळत आहे. जगभरात या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकार नमते घेण्यास तयार नाही. त्यामुळे जगभरात भारताची नाचक्की होत असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोडले आहे ( Balasaheb Thorat slams to Narendra Modi Government ) .

आंदोलन परिसरात केंद्र सरकारने इंटरनेट सेवा बंद केली आहे. रस्त्यावर खिळे टोकले आहेत. रस्त्यांची नाकाबंदी केली आहे. शेतकरी आंदोलन ( Farmers Protest ) चिरडण्यासाठी मोदी सरकार हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे ( Balasaheb Thorat allegation on BJP ).

Balasaheb Thorat slams to Narendra Modi Government
शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेली नाकाबंदी

आंदोलनाचा भाग म्हणून ‘राष्ट्रीय किसान मोर्चा’ने देशभरात ‘चक्का जाम’ची ( ChakkaJam ) हाक दिली आहे. या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठींबा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे ( Congress supported to ChakkaJam protest ).

हे सुद्धा वाचा

क्रिकेट संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर चर्चा

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, लता मंगेशकरांवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार

राजकारण कसे केले पाहिजे हे पाहण्यासाठी आपल्याला बाळासाहेब थोरात यांचा आदर्श घेतला पाहिजे !

कृषी कायदे ( Farmers law ) रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे नरेंद्र मोदी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आंदोलन चिरडू पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे.

Balasaheb Thorat slams to Narendra Modi Government
जगविख्यात गायिका रिहानाच्या एका ट्विटमुळे शेतकरी आंदोलन जगभरात पोचले आहे

यासंदर्भात थोरात ( Balasaheb Thorat ) पुढे म्हणाले की, देशाचा अन्नदाता आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. परंतु भाजपाचे हुकूमशाही सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

कृषी कायदे हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत. त्यामुळेच ते रद्द करावेत ही मागणी लावून धरत महाराष्ट्रासह देशभर आंदोलन करुन काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला आहे. कृषी कायदे मंजूर करवून घेताना संसदेत चर्चा केली नाही. विरोध तीव्र होत असताना आता मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचे केवळ नाटक करत आहे.

दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अनन्वीत अत्याचार सुरु केले आहेत ( Balasaheb Thorat said, BJP government harassing to Farmers ). आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे.

जगविख्यात गायिका रिहानाच्या एका ट्विटमुळे शेतकरी आंदोलन जगभरात पोचले आहे
भारतीय सेलब्रिटी मोदी सरकारची हुजरेगिरी करीत आहेत

दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभऱ नाचक्की होत आहे, असे थोरात ( Balasaheb Thorat ) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी