31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीय‘चार धाम’चे गौडबंगाल, बहुजनांना अंधारात ठेवण्याचे कारस्थान !

‘चार धाम’चे गौडबंगाल, बहुजनांना अंधारात ठेवण्याचे कारस्थान !

संतोष कापसे

सनातन धर्माची खरी चार धाम ( Char Dham ) यात्रा २५०० वर्षांपासून खालील ४ स्थळांवर चालू होती. पण आता मूळ स्थळांचा सनातन्यांना विसर पडला आहे. ते काल्पनिक स्थळांना भेट देऊन चार धाम ( Char Dham ) केल्याचा आनंद मानत आहेत.

 

  1. लुंबिनी : जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला.
  2.  बोधगया : जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.
  3. सारनाथ : जेथे भगवान बुद्धांना पहिल्यांदा बौद्ध धम्म गवसला, आणि धम्मचक्रपरिवर्तन केले.
  4. कुशीनारा : जेथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जगभरातील लोक भगवान बुद्धांच्या स्मृतीला आणि त्यांच्या सनातन धम्माला पुनर्जीवित करून सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या चार धम्मस्थळांना ( Char Dham ) अभिवादन करण्यासाठी या चार पवित्र स्थळांना भेट देत असतं आणि आजही भेट देतात.

षडयंत्रकारी ब्राह्मणांनी दिशाभूल करण्यासाठी चार धम्म ( Char Dham ) स्थळांऐवजी चार धामच्या ( Char Dham ) नावाने काल्पनिक, मनघडंत पौराणिक कथांवर आधारित देवदेवतांची तीर्थस्थळे बांधली. जेणेकरून लोक मूळ पवित्र श्रद्धा स्थानांपासून दूर जावीत, आणि खोट्या स्थानांकडे आकर्षित व्हावीत. हा त्यामागील दुष्ट हेतू होता.

Char Dham
लुंबिनी

बुद्ध हा सनातनच्या सांस्कृतिक वारशाचे शिखर आहे. जैन, बुद्ध, शीख, शैव, वैष्णव, सिद्ध, नाथ या सर्व सनातन धर्माच्या ( Char Dham ) शाखा आहेत. त्यांनी सनातन धर्म समृद्ध केला. परंतु ब्राह्मणांनी आम्हाला अज्ञानामध्ये ठेवण्यासाठी काल्पनिक देवी – देवता दिल्या. पुराणे आणि भाकडकथा दिल्या. सत्यापासून दूर, सनातन धर्मापासून दूर लोटले.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर ; पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या ‘या’ शुभेच्छा; म्हणाले…

नरेंद्र मोदींच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की : बाळासाहेब थोरातांचे टीकास्त्र

Buddha founder of Buddhism

ब्राह्मणांनी आपले दुकान देवळे, ज्योतिष, संस्कृत पांडित्य आणि पौरोहित्य या माध्यमातून चालू ठेवले. ते देवाचे रखवालदार झाले आणि त्यांनी बहुजनांना घोर अंधारात ढकलले. आम्हाला बुद्ध, महावीर, गुरु नानक, भगवान शिव आणि गोरक्षनाथ यांचे ज्ञान आणि त्यांची विधी परिचित होऊ दिली नाही.  आम्हाला नवनवीन भीती, पूजा, अर्चना, जप, बळी, यज्ञ, दान आणि कर्मकांड या विधींमध्ये अडकवले.

Char Dham
सारनाथ

कर्मवादाऐवजी दैववादावर विश्वास ठेवून नशिबाच्या आणि स्वर्गाच्या कल्पनांमध्ये व्यस्त ठेवले. शुद्ध धर्म उपलब्ध नव्हता. धर्मग्रंथ वाचण्याचा, ऐकण्याचा, ध्यान करण्याचा हक्क बहुजनांना नव्हता. भगवान राम ब्राह्मणांच्या ऐकण्यावरून शूद्र तपस्वी शंबुक ऋषीच्या कानात गरम शिषे ओततात. कारण ध्यान आणि तप करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे ? आत्मज्ञानाचा अधिकार फक्त मूठभर लोकांना होता. याला सनातन संस्कृती तुम्ही म्हणता का ? हा वैदिक धर्म जो सनातन आहे असे आपण म्हणतो त्यावर मूठभर लोकांची मक्तेदारी असू शकते का ?

एक हिंदू क्षत्रिय संन्यासी सिद्धार्थ गौतम आत्मज्ञान प्राप्त करून बुद्ध होतो आणि सनातन धम्माचे पुनर्जीवन करतो आणि तो धम्म सर्वाँसाठी खुला करतो. बहुजनांना सनातन धर्म शिकवतो. हे पाहून ब्राह्मण समाज चिडतो, घाबरतो आणि बुद्धाला वाळीत टाकतो. त्याला परका म्हणतो. काहीच इलाज चालेना म्हणून विष्णूचा बुद्ध हा आठवा अवतार म्हणून हिंदू धर्मात त्यांना अवताराचे स्थान देवून टाकतो. कारण बुद्ध पूर्ण वेगळा आहे अस जर त्यांनी म्हंटल असतं तर पूर्ण भारत बुद्धमय झाला असता. एकही व्यक्ती ब्राह्मणांच्या वैदिक कर्मकांडी धर्मात ‘बी’ साठी सापडली नसती. इथेच बुद्ध हिंदू धर्माचे अविभाज्य अंग आहेत हे सदैव ब्राह्मणांना मान्य करावे लागते. पण ते कधीच त्याच्या शिकवणुकीचा स्विकार करीत नाहीत.

Char Dham
बोधगया

बुद्ध सनातन धर्म हिंदू धर्मातील आठवे अवतार आहेत. पण ते जे शिकवतील ते सनातन धर्माचा भाग नाही. ते सनातन धर्म शिकवत नसून ते बुद्ध धर्म शिकवत आहेत असा दुटप्पी प्रचार केला.

सनातन धर्माला श्रेष्ठ आणि बुद्ध धर्माला कनिष्ठ वा हिन असा अपप्रचार केला. वस्तुतः बुद्ध जे शिकवत होते तोच खरा सनातन धर्म असून ब्राह्मण जो सनातन धर्मावर दावा ठोकत आहेत तो त्यांचा ब्राह्मणी वैदिक धर्म आहे. त्याचा सार्वत्रिक सनातन सत्य धर्माशी काहीही संबंध नाही.

ब्राह्मणांचा धर्म हा मूठभर लोकांचा आणि चौकटीतला धर्म असून तो बहुजनांना अज्ञानात ठेऊन त्याचे शोषण करणारा धर्म आहे. म्हणून बुद्ध सनातन धर्माचे खरे पाईक, वारसदार आहेत.

Char Dham
कुशीनारा

ब्राह्मण नेहमी बुद्धाला सावत्र मुलासारखी वागणूक देतात. त्याच्या शिकवणुकीचा पूर्ण स्वीकार करीत नाहीत. त्याला भगवान बोलतात आणि त्याच्या शिकवणुकीचा वेगळा पंथ, संप्रदाय म्हणून घोषित करतात.

हिंदू आणि बुद्ध धर्म वेगवेगळे आहेत असे जनमानसावर बिंबवितात. सनातन आणि बुद्धाचा काही संबंध नाही याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. जे ज्ञान सर्वांसाठी होते, ते सर्वांसाठी खुले केल्याचा मोठा द्वेष आणि चीड ब्राह्मणांना बुद्धाबद्दल आहे. बाह्मणांची सर्व दुकाने बंद होतील म्हणून बुद्धाला त्यांनी वेगळा, परका, वाया गेलेलं मूल, सावत्र मुल असे हिणवले. पण आमचं म्हणण्याचाही धूर्तपणा केलेला आहे.

बुद्ध पूर्ण सनातनी आहेत आणि त्यांना कोणी सोयीनुसार वापरू नये. आपण त्यांचा पूर्ण स्वीकार  करायला हवा. बहुजनांनी जागे होऊन हे सत्य आत्मसात करायला हवे.

Char Dham

जो सनातन धर्म सत्यावर आधारित आहे तो तुमच्यापर्यंत पोहचू न देणारे ब्राह्मण आहेत. बुद्ध तुमचा सखा, प्रिय, हितचिंतक आहे. सनातन धर्माचे गुह्य ज्ञान आणि सत्य तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे, या शुद्ध धर्माला तुमच्यासाठी खुले करण्याचे धाडस आणि पराक्रम केलेला हा अवलिया तुमचा बुद्ध आहे. तुम्ही त्याचे ऋणी का राहू नये ?

सर्व ग्रंथ आणि शास्त्र उच्च वर्गापुरते मर्यादित ठेवणारे ब्राह्मण होते. ते तुमच्यासाठी उघडे करणारा बुद्ध होता. बुद्ध हिंदू आणि पराक्रमी सनातनी होता, आहे आणि राहणार !

ही वैदिक संस्कृती म्हणजे सनातन धर्म नव्हे. वेदांचा, पुराणांचा, उपनिषद आणि 32 कोटी काल्पनिक देवदेवता यांचा सनातन धर्माशी काय संबंध ? थोतांडालाच सनातन धर्म म्हणून ब्राह्मणांनी तो बहुजनांच्या माथी मारला आहे. परंतु हा खरा सनातन धर्म नाही.

बुद्ध अनेक हिंदू गुरूंकडे शिकले. नंतर स्व:प्रयत्नाने त्यांनी सनातन धर्माचा आधार आणि मूळ शोधून काढलं. जे वेदात, पुराणात, उपनिषीदात सापडणार नाही. शुद्ध आणि सोपा सनातन धम्म जागा केला आणि नंतर सर्वाँना शिकवला. जो लुप्त पावला होता तो पुन्हा पुनर्जीवित केला. मग का नाही आपण त्याचे श्रेय बुद्धांना देणार ?

ब्राह्मणांनी सातत्याने बुद्धाला बदनाम केले. त्यांच्या शिकवणुकीकडे दुर्लक्ष केले. हीन वागणूक दिली. बुद्धाची शिकवण पसरू नये म्हणून ग्रंथ, विद्यापीठे, ग्रंथालये, बुद्ध साहित्य नष्ट करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्या त्या वेळच्या परकीय शासकांचे मंत्री, सल्लागार बनून ब्राह्मणांनी बुद्ध आणि बुध्दाचा सनातन धर्म नष्ट केला. ब्राह्मणांच्या पुराणांमध्ये आणि वेदांमध्ये तसेच त्यांच्या काल्पनिक देवता आणि मनघडंत पुराणांमध्ये सत्याचा प्रकाश नाही. सनातन धर्म सत्य धर्म आहे. त्यात कल्पनेला वाव नाही.

बुद्ध, महावीर, गुरु नानक, भगवान शंकर आणि गोरक्षनाथ हे जे जे शिकवतात, सांगतात, तो आहे सनातन धर्म!

जर विश्वास बसत नसेल तर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’  हे एकदा वाचाचं ! स्वत : त्यांनी मूठभर ब्राह्मणांच्या षडयंत्रातून सनातन धर्माचे जे सत्य लपविले, दडपले गेले ते खोदून बाहेर काढले. बुद्धांना सनातन धर्माचा अग्रदूत घोषित केले. बुद्धाशिवाय सनातन संस्कृती पूर्ण होऊच शकत नाही याची प्रचिती आणून दिली. साक्ष दिली.

भारत ही बुद्धाची भूमी आहे. सनातन सत्याच्या धम्माची ( Char Dham ) भूमी आहे. बुद्धाला परका मानू नका. बुद्ध हा सनातन धर्माचा भक्कम आधार आणि स्वयंप्रकाशित धम्म शिखर आहे.

Char Dham is not real which told by Brahmins

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी