28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रOpen Restaurant : रेस्टॉरंट लवकरच उघडण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

Open Restaurant : रेस्टॉरंट लवकरच उघडण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

टीम लय भारी

मुंबई : राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी (open restaurant) मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले.(CM hints to open restaurant soon)

राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. या स्थितीतही आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावले टाकायला सुरुवात केली आहेत. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा काही आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कर रूपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे. म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे नमूद केले.

राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे. त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणा-या कर्मचा-यांप्रती आहे, असे ते म्हणाले.

कोविडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत. दुर्दैवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेऊन सुरू करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही, असे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी