28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeनिवडणूकनाशिक लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला सुटला पाहिजे: महाराष्ट्र राज्याचे...

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला सुटला पाहिजे: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला सुटला पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस < Devendra Fadnavis > साहेब यांची आज शासकीय निवासस्थान सागर बंगला येथे नाशिक भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले ,आमदार सीमा हिरे, आमदार राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, केदा आहेर, गणेश गीते, मंडल अध्यक्ष भगवान काकड, अविनाश पाटील ,रवींद्र पाटील, एडवोकेट अरुण खांडबहाले, कुणाल वाघ, अमोल दिनकर पाटील, महेश हिरे, अजय दराडे, सुरेश पाटील,सोनाली कुलकर्णी आदी उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी चुकीच्या पद्धतीने हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केली आहे.शहरात तीन आमदार असल्याने नाशिक लोकसभा मतदार संघ भाजपाला सोडण्यात यावा.(Nashik Lok Sabha seat should be given to BJP: Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी.अशी एकमुखी मागणी सातपूर भाजपा मंडलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीच्या बैठकीत केली आहे.
_ भाजपा मंडलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष रामहरी संभेराव,महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी बोलकर,मंडल अध्यक्ष भगवान काकड,सिडको मंडल अध्यक्ष रवी पाटील,उपाध्यक्ष संदीप तांबे तसेच रवींद्र धिवरे,राजेश दराडे,रवींद्र जोशी,शिवाजी शहाणे यांनी मनोगत व्यक्त केले.शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असता नाशिक लोकसभा मतदार संघाचा उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव घोषित केले.खरे तर त्यांना उमेदवारी घोषित करण्याचा अधिकारच नाही. नाशिक लोकसभा मतदार संघासाठी भाजपाकडे दिनकर पाटील सारखा सक्षम उमेदवार आहे.त्यांनी संपूर्ण मतदारसंघात भाजपा घराघरात पोहोचविली आहे.ग्रामीण भागातील जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी ग्रामीण भागातील जनतेची देखील मागणी आहे.शिवाय मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे.तीन आमदार आहेत.त्यामुळे हा मतदार संघ भाजपालाच सोडण्यात यावा.अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.मागील दोन्ही निवडणुकीत भाजपाने हेमंत गोडसे यांना निवडून आणले आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी काहीही कामे केलेली नाहीत.तरीही गोडसे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाहीत.त्यामुळे ते पराभूत होतील.मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी दिनकर पाटील यांनाच उमेदवारी द्यावी.अशी आग्रही मागणी करण्यात आली.यावेळी संजय राऊत,युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके,युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील,गणेश बोलकर,रवींद्र जोशी,प्रवीण पाटील, अशोक जाधव, नारायण जाधवउदय बोरसे, योगेश मालुंजकर आदिंसह पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी