29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये संपत्तीच्या वादातून मारहाण

नाशिकमध्ये संपत्तीच्या वादातून मारहाण

फिर्यादी समन जसविंदरसिंग राजपूत , २७, रा. डी.६, तुलसी अपार्टमेंट, सीता गुंफारोड, पंचवटी, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी आणि त्यांचे वडील घराखाली गप्पा मारत उभे असताना संशयित रणजीत सिंग मोहनसिंग राजपूत, अगमज्योत रणजीत सिंग राजपूत दोघे रा. श्री तिरूमला लक्झुरिया, सिरीन मेडॉज, राईट कॅनल रोड, गंगापूर रोड, नाशिक, यश जोशी, रा. तपोवन नाशिक आणि आयुष चौधरी, रा. माहिती नाही यांनी रविवार दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तुलसी अपार्टमेंट, सीता गुंफारोड, पंचवटी यांनी येऊन प्रॉपर्टीच्या हिस्से < property dispute > वाट्यावरून कुरापत काढून फिर्यादी यांना समन राजपूत यांना वाईट साईट शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली .(Beaten up over property dispute in Nashik)

यावेळी संशयित आरोपी अगमजोत रणजीतसिंग राजपूत याने त्याच्या हातातील फायटर फिर्यादीचे समनच्या कपाळावर जोरात मारल्याने समन हा रक्तबंभाळ झाला. यावेळी समन याच्या गळ्यातील सोन्याची चैन देखील गहाळ झाली. यावेळी वडिलांनी हल्लेखोरांच्या ताब्यातून आपल्या मुलाची सुटका करून घेत समन याला उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी असलेल्या समन याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील संशयितांना पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे.

योगेश वासुदेव पवार, ४१ रा. फ्लॅट नंबर ५, आद्यशक्ती सोसायटी, संत जनार्दन स्वामी नगर, विजयनगर, आडगाव नाका पंचवटी यांनी फिर्याद दिली आहे कि, संशयित आरोपी अभिषेक राऊत, रा. आद्य शक्ती सोसायटी, संत जनार्दन स्वामी नगर, विजयनगर, आडगाव नाका, पंचवटी याने रविवार दि. २४ रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी योगेश पवार हे त्यांच्या घरासमोर असताना गाडी पार्किंग करण्याच्या किरकोळ कारणावरून संशयित अभिषेक राऊत आणि त्याच्या साथीदाराने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून हातातील लाकडी दांडा पवार यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.उप.नि. वनवे करीत आहे.

होळी सणाच्या दिवशी दुसरी हत्या : गेल्या वर्षी ६ मार्च रोजी होळीच्याच दिवशी पेठरोड शनिमंदिर पाठीमागे असलेल्या नवनाथ नगर येथील नानबाबा चाळ येथे राहणाऱ्या किरण सुकलाल गुंजाळ (३०) या युवकाची पूर्ववैमनस्य व भाईगिरीच्या वादातून भर रस्त्यात संध्याकाळच्या सुमारास गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. यावर्षी पुन्हा होळीच्याच दिवशी निलेश उपाडे याची हत्या करण्यात आल्याने या घटनेला उजाळा मिळाला आहे.
मयत निलेश उपाडे याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, या हत्याकांडातील संशयित विश्वास बाबर याच्यावर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा असून त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन संशयितांवर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे बालगुन्हेगारांनी पुन्हा आपले डोके वर काढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी