31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयरोहित पवारांनी घेतली वन अधिकाऱ्यांची भेट

रोहित पवारांनी घेतली वन अधिकाऱ्यांची भेट

लय भारी न्यूज नेटवर्क 

जामखेड  : वन विभागाच्या हद्दीपासुन इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये १० किमीच्या मर्यादेमध्ये विकासकामे करण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक रस्ते, उद्योग, खाणकाम यासारखी विकासकामे बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. हे वन परिक्षेत्रातील १० किमी निर्बंधाचे मोठे अंतर कमी करून येथील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांनी नागपुर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. काकोडकर यांची भेट घेतली.

यावेळी आमदार पवार यांनी काकोडकर यांना एक निवदेन दिले, व विस्तृत चर्चाही केली. या चर्चेत इको सेन्सेटीव्ह झोन मर्यादेचे  सुमारे १० किमीचे अंतर कमी करण्यात यावी ही प्रमुख मागणी केली. वन विभागाशी संबंधित मतदार संघातील इतर समस्यांबाबतही यावेळी त्यांनी चर्चा केली. वन विभागाच्या हद्दीतुन ग्रामस्थांना रस्ते, वन परीक्षेत्रातील गावांचे ग्रामविकास आराखडे, वनविभागाच्या विविध योजनांसाठी प्रलंबित निधी व नव्याने योजना राबविण्यासाठी मागणी अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील पाणी वितरणासाठी महत्वाचा विषय असलेल्या तुकाई चारीच्या कामाकरता वन विभागाच्या हद्दीतील क्षेत्राचा प्रस्तावही लवकर मंजूर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वन परिक्षेत्रातील १० किमी निर्बंधाचे मोठे अंतर कमी करण्याबतचा प्रस्ताव येत्या काही महिन्यात लवकरच मंजुर होऊन येथील सर्व प्रलंबित विकासकामे पुर्ण होतील व त्याकरिता केंद्र शासनाकडेही आपण पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

नागपूरच्या महापौरांवर गोळीबार, अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे हल्ला झाल्याची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवार धावले

रा. स्व. संघाच्या अभ्यासवर्गाला राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, जयकुमार गोरेंची हजेरी

मंत्रीमंडळाला अंधारात ठेवून उच्च शिक्षण विभागात भरतीचा घाट

मंत्र्यांकडे पीएस, ओएसडी पदांवर वर्णी लावण्यासाठी शेकडोजणांचे लॉबिंग

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी