29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्र’मी दाऊद इब्राहीमला दम दिला’’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

’मी दाऊद इब्राहीमला दम दिला’’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई : मी क्राईम रिपोर्टींग करत असतांना दाऊद इब्राहीमला भेटलो. सोबत फोटोही काढले आणि दाऊद इब्राहीमला दमही दिला. असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत बुधवारी ( १५ जानेवारी ) केला.

क्राईम रिपोर्टींग करत असताना कोणतीही भीती ही मनात नसावी, मी घाबरत नाही. मी तर नेहमी म्हणतो या माझ्या अंगावर पण कुणी येतंच नाही. पंतप्रधान,गृहमंत्री,गँगस्टर यांना घाबरायचं नाही. मी दगडी चॉलमध्ये जाऊन रिपोर्टींग केली. कुणीही तुम्हाला धक्का लावत नाही. भीती ही तुमच्या मनात असते असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब नेहमीच माझं कौतुक करायचे.

प्रत्येकाच्या इच्छेनुसार हे सरकार निर्माण झालयं…

महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार उत्तम काम करेल असा दावा संजय राऊत यांनी केला. सरकार जेव्हा काम करतं तेव्हा चुका होतात. विरोधी पक्षाने सरकारला काम करु द्यायला पाहिजे. सरकार जेव्हा काम करतं तेव्हा चुका होत असतातं. किमान एक वर्ष सरकारला काम करु दिलं पाहिजे. सत्ताधा-यांनी विरोधकांना बळ दिलं पाहिजे. आमचा सुपरहिट सिनेमा सुरु आहे. असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी